आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'मुंज्या' (Munjya Movie) चित्रपट ७ जूनला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ४ कोटी २१ लाखांची कमाई केली. तर तीन दिवसात जवळपास २० कोटींचा गल्ला सिनेमाने जमवला आहे. या चित्रपटात बरेचसे मराठी कलाकार झळकले आहेत. तर यात मुख्य मुंज्याची भूमिकादेखील मराठमोळ्या बालकलाकाराने साकारली आहे.
मुंज्या सिनेमात मुंज्याची मुख्य भूमिका बालकलाकार आयुष उलगडे याने साकारलीली आहे. त्याच्या व्यतिरिक्त यात शर्वरी वाघ, सुहास जोशी, श्रुती मराठे, भाग्यश्री लिमये, रसिका वेंगुर्लेकर, अनय कामत, अजय पूरकर, बालकलाकार खुशी हजारे हे कलाकार आहेत. मुंज्या म्हणजेच गोट्याच्या भूमिकेसाठी आयुषची सुरुवातीला लुक टेस्ट घेण्यात आली तेव्हा त्याची या भूमिकेसाठी निवड करण्यात झाली. आयुषने ही भूमिका अतिशय उत्तम साकारली आहे.
आयुषने या मालिकेत केलंय कामआयुष उलगडेने मुंज्या सिनेमाआधी राजा राणीची गं जोडी, ढ लेकाचा, संत गजानन शेगावीचे, दख्खनचा राजा ज्योतिबा, अधाशी अशा अनेक कलाकृतीतून झळकला आहे. सध्या तो इंद्रायणी या मालिकेत काम करतो आहे. कोल्हापूरच्या शिंदे थिएटर अकॅडमीमधून आयुषने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. आयुषने मराठी मालिकाविश्वात चांगला जम बसवला असून मुंज्या या चित्रपटातून त्याला बॉलिवूडमध्येही ओळख मिळाली आहे.
'मुंज्या' सिनेमाबद्दल...गोट्या हा मुलगा वयाने मोठ्या असलेल्या मुन्नीसोबत एकतर्फी प्रेम करत असतो. त्याचे हे वागणे त्याच्या घरच्यांना पटत नसते. पण अघोरी कृत्य करून गोट्या काळी जादू करतो आणि यातच त्याला जीव गमवावा लागतो. पण तब्बल ७० वर्षाने तो पुन्हा एका वेगळ्या रुपात येऊन मुन्नीला शोधायला येतो. त्याचा हा शोध कसा पूर्ण होतो हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.