Join us  

‘जो जीता वही सिकंदर’चा ‘हा’ अभिनेता अचानक कुठे गायब झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 8:00 AM

 ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटानंतर आमिरचा ख-या अर्थाने बॉलिवूडचा ‘सिकंदर’ बनण्याचा प्रवास सुरू झाला. पण याच सिनेमात आमिरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता मामिक सिंह अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला.

ठळक मुद्दे सुरूवातीला करिअर मामिकने अनेक चुका केल्या. करिअर फार गंभीरपणे न घेतल्याने अनेक काळ तो इंडस्ट्रीतून गायब दिसला.

1992 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा (Aamir Khan) ‘जो जीता वही सिकंदर’ ( jo jeeta wohi sikandar) हा सिनेमा प्रचंड गाजला. आमिरसोबत पूजा बेदी, आयशा जुल्का, दीपक तिजोरी, कुलभूषण खरबंदा आणि मामिक सिंह अशा कलाकारांनी समृद्ध असा हा सिनेमा बॉलिवूडचा एक कल्ट क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो. आजही हा सिनेमा टीव्हीवर लागलेला दिसला की, टीव्हीसमोरून हलायचे मन होत नाही. चित्रपटातील शेवटची सायकल रेस, आयत्या वेळेला गिअर बदलून आमिरचं जिंकणं सगळंच मनाला भिडतं. या चित्रपटानंतर आमिरचा ख-या अर्थाने बॉलिवूडचा ‘सिकंदर’ बनण्याचा प्रवास सुरू झाला. पण याच सिनेमात आमिरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता मामिक सिंह (Mamik Singh)  अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. हा मामिक सिंह आज कुठे आहे? काय करतो? कसा दिसतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज आम्ही त्याच्याच बद्दल सांगणार आहोत.

‘ जो जीता वही सिकंदर’मध्ये मामिकने आमिरच्या मोठ्या भावाची भूमिका अतिशय मार्मिकरित्या साकारली. त्याच्या या भूमिकेचे कौतुकही झाले. पण या सिनेमानंतर काही मोजके सिनेमात तो दिसला आणि अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला.

‘ जो जीता वही सिकंदर’नंतर आमिरच्या करिअरची गाडी सूसाट धावू लागली. याऊलट मामिकला या सिनेमाचा फार काही लाभ झाला नाही. उत्तम काम करूनही यानंतर त्याला सिनेमे मिळेनासे झालेत. चित्रपटात काम मिळत नाही म्हटल्यावर त्याने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. चंद्रकांता, युग, सॅटरडे सस्पेन्स, बेताल पच्चीसी, दीवार, रिश्ते अशा अनेक मालिकांत तो दिसला. 

‘ जो जीता वही सिकंदर’नंतर तब्बल पाच वर्षांनी त्याने कमबॅक करण्याचाही प्रयत्न केला. आर या पार, दिल के झरोखे में, कोई किसी से कम नहीं या सिनेमात त्याची वर्णी लागली. पण या सिनेमांचाही काहीच फायदा झाला नाही. अगदी हे सिनेमे कधी आलेत अन् कधी गेलेत, हेही कळले नाही. 2000 साली ‘क्या कहना’ या चित्रपटात त्याने प्रीती झिंटाच्या भावाची भूमिका साकारली. पण याही चित्रपटाने मामिकची निराशा केली.

  अक्षय कुमारच्या ‘बेल बॉटम’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमात मामिकने एक छोटीशी भूमिका साकारली आहे. पण ही भूमिका इतकी लहान आहे की, कदाचितच त्याला कोणी नोटीस करेल. याआधी गतवर्षी रिलीज झालेल्या ‘स्कॅम 1992’ या वेबसीरिजमध्ये मामिक दिसला होता.  सुरूवातीला करिअर मामिकने अनेक चुका केल्या. करिअर फार गंभीरपणे न घेतल्याने अनेक काळ तो इंडस्ट्रीतून गायब दिसला. पण आता तो करिअरची नवी इनिंग सुरु करताना दिसतोय.

टॅग्स :आमिर खानबॉलिवूड