मोठमोठ्या गायकांमध्ये बसून तबला वाजवणारा हा लहान मुलगा कधी बॉलिवूडचा गोल्डन स्टार बनेल, हे कुणाला माहिती होते. तबला वादनाची आवड असलेला हा मुलगा त्याच्या गाण्यांमुळे आणि सोन्यामुळे जगभर ओळखला जाऊ लागला. डिस्को किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्टारने बॉलिवूडला अनेक लोकप्रिय डिस्को साँगस दिली. मात्र नुकतेच वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण बॉलिवूड शोककळा पसरली.
फोटोत आपल्या चिमुकल्या हातांनी तबला वाजवत कॅमेऱ्याकडे बघत असलेला हा मुलगा दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा डिस्को किंग बप्पी लहरी (Bappi Lahiri) आहेत. बप्पी लहरी यांनी आज वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे.
एका बंगाली कुटुंबात बप्पी लहरी यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव आलोकेश लहरी होते. बप्पी दांचा जन्म 27 नोव्हेंबर 1952 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. बप्पी लहरी यांना बप्पी दा आणि डिस्को किंग ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. बप्पी दांच्या वडिलांचे नाव अपरेश लहरी आणि आईचे नाव बन्सरी लहरी होते. बप्पी दा यांचा विवाह 24 जानेवारी 1977 रोजी चित्रानी लाहिरीसोबत झाला होता. त्यांना दोन मुले मुलगी रेमा आणि मुलगा बप्पा आहेत.
80च्या दशकात मिळाली प्रसिद्धी बप्पी दा यांनी दादू चित्रपटाद्वारे बंगाली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच वेळी, नन्हा शिकारी या चित्रपटाद्वारे बॉलीवूड चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. बप्पी दांची गाणी 80 च्या दशकात खूप लोकप्रिय झाली होती. बप्पी दा यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट 1975 मध्ये रिलीज झालेल्या 'जुक्की' चित्रपटातून आला होता. बप्पी लहरी यांनी या चित्रपटाला संगीत दिले असून पार्श्वगायकाची भूमिकाही त्यांनी केली आहे.