आदिपुरुषचा बहुप्रतिक्षित टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या व्हिडीओसोबतच व्हीएफएक्स, कलाकारांच्या लूकची इंटरनेटवर बरीच चर्चा होत आहे. एकीकडे लोक अभिनेता प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या लूक आणि अभिनयाबद्दल बोलत आहेत, तर दुसरीकडे अनेक लोक भगवान हनुमानाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे कौतुक करत आहेत. हनुमानाच्या भूमिकेतील या मराठमोळ्या अभिनेत्याला ओळखलंत का? हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून देवदत्त नागे आहे.
अभिनेता देवदत्त नागेने आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, जय श्रीराम.. मंत्रों से बढ़के तेरा नाम…जय श्री राम. आदिपुरुषमध्ये देवत्त हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा या चित्रपटातील लूक पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. खरेतर त्याला या लूकमध्ये ओळखणं कठीण झालं आहे.
देवदत्तने प्रामुख्याने मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'जय मल्हार'मध्ये त्याने खंडोबाची भूमिका साकारली होती. त्याची ही व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय ठरली होती. त्याचा 'जय मल्हार'मधील लूक लोकांना इतका आवडला होता की, मालिका संपून काही वर्षे झाली तरी या लुकमधील गणेशमूर्ती आणि सजावट केली जाते. आजही शाळेत आयोजित फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मुले त्याचा गेटअप करतात.
'जय मल्हार'सोबतच देवदत्तने 'वीर शिवाजी', 'देवयानी', 'बाजीराव मस्तानी' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. देवदत्त वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा आणि सत्यमेव जयतेमध्ये काम केले आहे.