Join us

मशाल हाती घेऊन दिसली झलकारी बाई, 'Manikarnika: The Queen of Jhansi' टीझरमध्ये अंकिता लोखंडेचा दमदार अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 2:53 PM

मणिकर्णिकाचा विषय काढताच कंगणा राणौतचे नाव सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते. टीझरमध्येही कंगणाचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे.

'मणिकर्णिका-दि क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट झाशीची राणी हिच्यावर आधारित आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या टीझरबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' चा टीझर आऊट झाला आहे. मणिकर्णिकाचा विषय काढताच कंगणा राणौतचे नाव सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते. टीझरमध्येही कंगणाचा अंदाज रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला आहे. मात्र कंगणाबरोबरच आणखीन एका अभिनेत्रीचा ऑनस्क्रीन लूक रसिकांचे लक्ष वेधुन घेत आहे.

ती अभिनेत्री म्हणजे हिंदी टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवलेली अंकिता लोखंडे. रिलीज झालेल्या टीझरमध्ये कंगणाबरोबरच अंकिताचा लूकही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे  रानी लक्ष्मी जेव्हा बाळाला घेऊन मैदानात उतरते तेव्हा तिच्या बरोबर झलकारी बाई पाहायला मिळते. झलकारी बाई ही राणी लक्ष्मीबाईची सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणून ओळखली जायची. झलकारी बाईच्याच भूमिकेत अंकिता लोखंडे साकारत आहे. हातात मशाल पकडत झलकारी बाई बनलेली अंकिता लोखंडे या टीझरमध्ये भाव खावून जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून कंगनाचा हा सिनेमा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आधी हा सिनेमा दिग्दर्शक क्रिश दिग्दर्शित करत होते मात्र कंगनाच्या हस्तक्षेपामुळे क्रिश यांनी हा सिनेमा अर्धवट सोडून दिला त्यानंतर कंगना 45 दिवसांचे दिग्दर्शन या सिनेमाचे स्वत: केले.  क्रिशनंतर अभिनेता सोनू सूदने देखील हा सिनेमा मध्येच सोडून दिला आहे. 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा चित्रपट पुढील वर्षी 25 जानेवारी 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कंगनाचा रणरागिणी अंदाज व अॅक्शन करताना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

 वैभव आणि अंकिता यांनी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.  या सिनेमाचं शुटींग राजस्थानच्या बिकानेरमध्ये झाले आहे. एकत्र काम करताना त्यांच्यात चांगलीच मैत्री निर्माण झाली. वैभव म्हणतो, ‘आम्ही दोघंही प्रचंड फुडी आहोत. आम्ही एकत्र असलो की आमचं डाएट कुठल्या कुठे पळतं. काही दिवसांपूर्वी आम्ही दालबत्ती, गाजराचा हलवा आणि आईस्क्रीमवर ताव मारला होता. अलसिसार इथं आम्ही खास हे पदार्थ खाण्यासाठी गेलो होतो. जयपूरपासून अलसिसार हे तीन तासावर आहे. केवळ दालबत्ती आणि आईस्क्रीम खाण्यासाठी आम्ही तीन तास प्रवास करून गेलो.’ 

एवढंच नव्हे तर वैभवने एक नवी गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी सांगितली आहे. वैभव आणि अंकिता हे दोघेही प्रचंड अध्यात्मिक आहेत. तो म्हणतो यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही, मात्र आम्ही दोघं एकत्र असलो की आमच्यात अध्यात्मिकतेवर बरीच चर्चा होते. श्री श्री रविशंकर आणि सद्गुरुंची बरीच पुस्तकं वाचली आहेत. त्यामुळे आम्ही अध्यात्मिक विषयावर खूपवेळ गप्पा मारतो. 

टॅग्स :माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसीअंकिता लोखंडे