Join us

स्टायलिश प्रियांका चोप्राचा देसी अंदाज तुम्ही पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:40 PM

भारतीय संस्कृतीत लग्नानंतर मंगळसुत्र घालण्याची प्रथा वर्षानुवर्षापासून चालत आलीये. लग्नानंतर मंगळसुत्राचे विशेष महत्त्व सांगितले जाते. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री लग्नानंतर स्टाईलिश पद्धतीने मंगळसुत्र घालतात. त्यामुळे ‘देसी गर्ल’ विदेशात राहूनही मंगळसुत्र घालते म्हटल्यावर चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आता केवळ बॉलिवूडपर्यंतच मर्यादित राहिलेली नसून ती आता एक ग्लोबल पर्सनॅलिटी बनली आहे. हॉलिवूडमध्ये चित्रपट मिळायला लागल्यानंतर तिचे बॉलिवूडमधील वजन देखील वाढले. प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या लूक्स आणि स्टाईलमुळे चर्चेत असते. अलीकडेच ती अत्यंत स्टायलिश लूकमधील देसी अंदाजात दिसली. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आम्ही हे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

फॅशन आयकॉन म्हणूनही ती ओळखली जाते. सध्या ती लंडनमध्ये स्थिरावली आहे. अलिकडे तिच्या काही फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाचा देसी अंदाज पाहायला मिळत आहे. प्रियांकाच्या स्टायलिश लूकची तर नेहमीच चर्चा होत असते. मात्र, यावेळी चर्चा होतेय ती तिच्या मंगळसुत्राची. अलिकडेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती अतिशय स्टायलिश लूकमध्ये दिसतेय. विशेष म्हणजे तिने देसी परंपरा जपत मंगळसुत्रही घातले आहे. तिच्या या मंगळसुत्राची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते आहे.

भारतीय संस्कृतीत लग्नानंतर मंगळसुत्र घालण्याची प्रथा वर्षानुवर्षापासून चालत आलीये. लग्नानंतर मंगळसुत्राचे विशेष महत्त्व सांगितले जाते. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री लग्नानंतर स्टाईलिश पद्धतीने मंगळसुत्र घालतात. त्यामुळे ‘देसी गर्ल’ विदेशात राहूनही मंगळसुत्र घालते म्हटल्यावर चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. प्रियांकाने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप पाडली आहे. निक जोनाससोबत लग्नानंतर तिने ‘इझन्ट इट रोमँटिक’ या चित्रपटात झळकली. या चित्रपटानंतर हॉलिवूडमध्येही तिच्या अभिनयाची क्रेझ पाहायला मिळते.

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड