Join us  

​सोनम कपूरचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबतचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलातं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2017 6:35 AM

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सोनम कपूरने तिचा कथित बॉयफ्रेन्ड आनंद अहुजासोबतचा असाच एक ‘फनी’ व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बॉलिवूडची बिनधास्त गर्ल सोनम कपूर हिला कुठलीच लपवाछपवी आवडत नाही. मग तिचा कथित बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा याच्याबद्दल तरी ती का लपवाछपवी करणार? आनंदसोबतचे नाते सोनमने खुलेआम जाहिर केलेले नाही. पण त्याच्यासोबत ती अगदी बिनधास्त फिरते. त्याच्यासोबतचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करायला तिला कुठलाही संकोच वाटत नाही. आत्ताही सोनमने आनंदसोबतचा असाच एक ‘फनी’ व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमुळे सोनम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओला सोनमने कॅप्शन दिलेय,‘ प्रत्येक गोष्ट चांगलीच होणार. चांगलीच नाही तर उत्तम होणार. कधीकधी एक पाऊल मागे घेतल्याने मार्ग सापडतो आणि हा मार्ग पुढे जाण्याची परवानगी देतो’. सोनम आणि आनंद परस्परांसोबत किती कंफर्टेबल असतात, हेच या व्हिडिओमधून दिसते. गेल्या काही दिवसांत सोनम आणि आनंद अनेकदा एकत्र दिसले. ‘रूस्तम’च्या सक्सेस पार्टीत हे ‘लव्ह बर्ड्स’ एकत्र दिसले होते. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा सगळीकडे पसरली होती. पण सोनम या चर्चांना उत्तर देण्याच्या भानगडीत पडली नाही.सध्या सोनम ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात बिझी आहे. सोनमची बहिण रिया कपूर या चित्रपटाची निर्माती आहे. यात सोनमसोबत करिना कपूर आणि स्वरा भास्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत. काल-परवा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचे शूटींग सुरु झाले. या चित्रपटाशिवाय सोनम लवकरच अक्षय कुमार आणि राधिका आपटे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. एकंदर काय तर सोनम सध्या जोरात आहे. आनंदसोबतची कंपनी आणि बॉलिवूडचे काम सगळेच सोनम भरपूर एन्जॉय करतेय.