Join us

DDLJ मधूल लोकप्रिय झालेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का? हाती काम नसल्याने बनली स्टँड अप कॉमेडियन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 3:40 PM

अभिनेता शाहरुख खान तसेच काजोल स्टारर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात अभिनेत्री पूजा रुपारेल हिने चुटकी नावाचं पात्र साकारलं होतं.

Pooja Ruparel :  ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आयकॉनिक चित्रपट १९९५ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. तब्बल २८ वर्षानंतरही या चित्रपटाची क्रेझ अजुनही कायम आहे. हिंदी सिनेसृष्टीसाठी हा चित्रपट खऱ्या अर्थाने मैलाचा दगड ठरला. त्यावेळी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती, शिवाय कमाईचे अनेक विक्रमही या चित्रपटाने रचले.

अभिनेता शाहरुख खान तसेच काजोल स्टारर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटात अभिनेत्री पूजा रुपारेल हिने चुटकी नावाचं पात्र साकारलं होतं. DDLJ मधून काजोलच्या बहिणीची भूमिका साकारत ही अभिनेत्री लोकप्रिय झाली.त्यावेळी चुटकीच्या भूमिकेत दिसलेली बालकलाकार पूजा रुपारेल सध्या काय करते तुम्हाला माहिती आहे का ?

अभिनेत्री पूजा रुपारलेने साकारलेली ही भूमिका चाहते आजही विसरु शकले नाहीत. शाहरुख काजोलच्या भूमिकेपेक्षाही आपल्या हटके अभिनयाने तिनं चाहत्यांना भूरळ घातली होती. आता ती लहानशी 'छुटकी' ४२ वर्षांची झाली आहे .पूजा रुपारेल सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. तिला इंडस्ट्रीमध्ये कोणतीही कामे मिळत नसल्याने अभिनेत्रीने सिनेसृष्टीकडे पाठ फिरवली. आजही पूजाने सिमरनच्या बहिणीची केलेली भूमिका लोकांच्या लक्षात आहे.

या आधीही बॉलिवूडमध्ये केलंय काम :

इतकेच नाही तर याआधीही तिने शाहरुख खानसोबत 'किंग अंकल'मध्ये काम केले होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पूजा एका फिल्मी घराण्याशी संबंधित आहे. ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा तिचे काका आहेत. तर सोनाक्षी सिन्हा तिची चुलत बहीण आहे. आता ती स्टँड अप कॉमेडियन म्हणून काम करत आहे. याशिवाय ती  व्हॉईसओव्हर आर्टिस्टचे काम करते. शिवाय पूजाने 'एक्स पास्ट इज प्रेझेंट' आणि 'पेला आधी अक्षर' या चित्रपटात काम केले आहे.

टॅग्स :शाहरुख खानकाजोल