आज छोट्या पडद्यावर दिलीप जोशी (dilip joshi) यांचा मोठा दबदबा असल्याचं पाहायला मिळतो. जेठालाल या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेल्या दिलीप जोशी यांनी त्यांच्या करिअरमध्ये मोठा स्ट्रगल केला आहे. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी छोट्या पडद्यावर आणि बॉलिवूडमध्ये काम करताना कसे लोक भेटले, त्यांच्याकडून कोणते अनुभव आले हे सांगितलं. यात त्यांनी 'हम आपके हैं कौन'च्या सेटवर त्यांना सलमान खानने (salman khan) कसं वागवलं हे सांगितलं.
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या मैंने प्यार किया या सिनेमात दिलीप जोशी यांनी छोटेखानी भूमिका साकारली होती. या सिनेमात सलमान मुख्य भूमिकेत होता. या सेटवर सलमानचा वावर कसा होता, तो सहकलाकारांशी कसं वागायचं हे दिलीप जोशी यांनी राजश्री प्रोडक्शनच्या एका मुलाखतीत सांगितलं.
दिग्दर्शक सूरज बडजात्या सेटवर प्रत्येक कलाकाराला समान वागणूक द्यायचे. त्यांनी कधीच कलाकारांमध्ये भेदभाव केला नाही. त्यावेळी या सिनेमाचं शुटिंग फिल्मिस्तानमध्ये सुरु होतं. तेव्हा एक दिवस मला आणि सलमानला एकत्र रुम शेअर करायला सांगितली होती. विशेष म्हणजे मी सलमानसोबत रुम शेअर करणार हे ऐकून त्याला काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्याने कोणतेही नखरे न करता माझ्यासोबत रुम शेअर करायला तो तयार झाला. सलमानसोबत चित्रपटात काम करताना खूप मज्जा आली त्यावेळी, असं दिलीप जोशी म्हणाले.
दरम्यान, हम आपके हैं कौननंतर दिलीप जोशी 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'यश', 'खिलाड़ी 420', 'हमराज', 'वन टू का फोर', 'दिल है तुम्हारा', 'क्या दिल ने कहा', 'फिराक', 'ढूंढते रह जाओगे' आणि 'वॉट्स योर राशि' यासारख्या सिनेमांमध्ये झळकले.