बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रविवारी सकाळी मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या तब्येतीविषयी त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली होती.
कालच दिलीप कुमार यांना डिस्चार्ज करण्यात आले असून त्यांना स्ट्रेचरवरून बाहेर आणण्यात आले. त्यांचा रुग्णालयाबाहेरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो रोहित सरैय्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून दिलीप कुमार यांची तब्येत चांगली असल्याबद्दल त्यांचे फॅन्स देवाचे आभार मानत आहेत.
दिलीप कुमार यांना बायलेटलर फ्ल्यूरल इफ्यूजनमुळे (Dilip Kumar Bilateral Pleural Effusion) आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते आणि काही दिवस ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. कार्डियोलॉजिस्ट डॉ. नितीन गोखले आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते.