97 वर्षांचे बॉलिवूडचे ‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून फार बरी नाही. ते कमालीचे अशक्त झाले असून त्यांची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा कमी झाली आहे. अशात दिलीप साहेबांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करा, असे आवाहन त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी केले आहे.
वो मेरी जिंदगी है...मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है, असे सायरा बानो यावेळी म्हणाल्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. त्यासाठी मला कोणी बळजबरी केलेली नाही. मला कोणत्याही कौतुकाची अपेक्षा नाही. त्यांचा स्पर्श, त्यांचा सहवास हाच माझ्यासाठी जगातील सर्वात मोठा आनंद आहे. मी त्यांच्यावर प्रेम करते आणि ते माझा श्वास आहेत, असे सायरा बानो म्हणाल्या.
याच वर्षी दोन भावांचे निधनकोरोना संक्रमणामुळे याच वर्षात दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे निधन झाले. 21 ऑगस्टला त्यांचा लहान भाऊ असलम यांचे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. यानंतर 2 सप्टेंबरला आणखी एक भाऊ अहसान यांनी जगाचा निरोप घेतला होता. ते 90 वर्षांचे होते.