Join us

Video: "पंजाबी लोक मुंबईला जाऊ शकत नाहीत...", दिलजीत दोसांझ कॉन्सर्टमध्ये काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 14:10 IST

दिलजीतने सोशल मीडियावर कॉन्सर्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी तो बोलला आहे.

पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा (Diljit Dosanjh) नुकताच ' अमर सिंह चमकीला' सिनेमा रिलीज झाला. त्याच्या अभिनयाचं सर्वस्तरांवर कौतुक होतंय. दिलजीतने याआधी आपल्या पंजाबी गाण्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. नंतर त्याचा 'गुडन्यूज' सिनेमातील अभिनयही प्रेक्षकांना आवडला. तर आता चमकीलामधून त्याने आपलं टॅलेंट सिद्ध केलं आहे. शिवाय त्याच्या गाण्यांवर चाहतेच काय अख्खं बॉलिवूड फिदा आहे. शनिवारी रात्रीच दिलजीतचं लाईव्ह कॉन्सर्ट पार पडलं. यावेळी प्रेक्षकांची तौबा गर्दी पाहायला मिळाली. आता दिलजीतने सोशल मीडियावर कॉन्सर्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये काही इंटरेस्टिंग गोष्टी तो बोलला आहे.

 दिलजीतने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला दिसते जिच्या हातात 'मैरी मी दिलजीत' असं पोस्टर आहे. चाहते दिलजीतला फोनमध्ये रेकॉर्ड करत आहेत. सर्व लोक त्याच्या गाण्यांमध्ये रमले आहेत. दिलजीत स्टेजवरुनच लोकांशी संवादही साधताना दिसत आहे. दिलजीतने प्रेक्षकांसोबत पंजाबी लोकांशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या.

तो व्हिडिओमध्ये म्हणतो, "आधी लोक म्हणायचे की पंजाबी लोक फॅशन करु शकत नाही मी म्हणलं मी करुन दाखवतो. मग लोक म्हणाले की पंजाबी लोक अभिनय करुन शकत नाही मी तेही करुन दाखवलं. नंतर लोक म्हणाले पंजाबी मुंबईत जाऊ शकत नाही मी तेही चुकीचं सिद्ध केलं. पंजाबी 'बार एरेना'मध्ये तिकीट विकू शकत नाही असंही काही जण म्हणाले, पण माझ्या कॉन्सर्टला तर स्टेडियम हाऊसफुल झालं आहे. पंजाबी इलुमिनाटी करु शकत नाही अशीही चर्चा झाली मी म्हणालो की मी डि-लुमिनाटी करेन."

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूड कलाकारही सामील झाले होते. वरुण धवन, क्रिती सेनन, करीना कपूर खान, आयुष्मान खुराना, विजय वर्मा, तमन्ना भाटियासह अनेक कलाकारांचा समावेश होता. दिलजीतने पुन्हा एकदा तो बेस्ट परफॉर्मर असल्याचे सिद्ध केले.

टॅग्स :दिलजीत दोसांझपंजाबसंगीतबॉलिवूड