२०२० हे वर्ष जगभरातील लोकांसाठी वाईट राहिलं. यावर्षी कोरोना व्हायरस महामारीने आपल्या आयुष्यात एन्ट्री मारली आणि फिल्म इंडस्ट्रीवरही टाळं लागलं होतं. अशात अनेक सेलिब्रिटींनी फिल्म इंडस्ट्रीतील कामगारांना आणि सर्वसामान्य लोकांना मदत केली. अनेकजण बेरोजगार झालेत. अशात अभिनेता दिलजीत दोसांजने २०२० मध्ये पॉझिटिव्ह राहण्याबाबत सांगितले.
आयसोलेशनमध्ये कसा गेला दिलजीतचा वेळ?
दिलजीत दोसांज यावर्षाच्या शेवटी शेवटी ट्विरवर कंगना रणौतसोबत पंगा घेऊन इंटरनेट सेंसेशन बनला. कंगनासोबत दिलजीतचं ट्विटर वॉर शेतकरी आंदोलनावरून झालं होतं. ज्यानंतर त्याची सगळीकडे चर्चा झाली. पण आता दिलजीतने त्याच्या ताज्या मुलाखतीत कंगनाबाबत नाही तर कामाबाबत गप्पा केल्या. त्याने सांगितले की, त्याने सांगितले की, कशाप्रकारे २०२० सारख्या कठीण काळात त्याने स्वत:ला पॉझिटिव्ह ठेवलं.
तो म्हणाला की, 'एक तर तुम्ही एखाद्या गोष्टीवर रडता किंवा हसता. मी माझ्या आयसोलेशन काळात आनंदी राहणं निवडलं. हा माझ्यासाठी फार क्रिएटीव्हिटीचा वेळ होता. अर्थातच कामाचं नुकसान झालं. पण सर्वच यात अडकले आहेत सर्वांच्या कामाचं नुकसान झालं आहे. मग मी का आरडा ओरड करू? आपल्या अवलंबून असतं की, एका परिस्थितीत पॉझिटिव्ह रहायचं आहे किंवा निगेटीव्ह. मी आनंदी राहणं निवडलं'.
आयसोलेशनमध्ये तयार केलं म्युझिक
दिलजीतने सांगितलं की, त्याने आपल्या आयसोलेशनमधील वेळ गाणी लिहिण्यात घालवला. तो म्हणाला की, 'माझ्या म्युझिकचे फॅन्स मला म्युझिशियन म्हणून मला माझ्या मूळांकडे परत जाण्यासाठी सांगत होते. अशात मी एका ट्रेडिशनल पंजाबी फोक गाण्याच्या अल्बमवर काम केलं. ही ती गाणी आहेत जी ऐकत मी मोठा झालो आणि आता वेळ आली आहे जगाला सांगू ही गाणी माझ्यासाठी किती महत्वाची आहे'.