Join us

डिंपल कपाडिया यांच्या आईचे निधन, रूग्णालयाबाहेर दिसले अक्षय-ट्विंकल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 10:06 AM

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेटी कपाडिया यांचे मुंबईतील एका रूग्णालयात निधन झाले.

ठळक मुद्दे नुकताच डिंपल यांची आई बेटी कपाडिया यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला होता.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची आई बेटी कपाडिया यांचे आज पहाटे 4 च्या सुमारास मुंबईतील एका रूग्णालयात निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या रूग्णालयात भरती होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांची नात ट्विंकल खन्नाअक्षय कुमार दोघेही रूग्णालयाबाहेर दिसले.काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमार हिंदुजा हॉस्पिटलबाहेर दिसले होती आणि त्यावरून डिंपल कपाडिया रूग्णालयात भरती असल्याची चर्चा पसरली होती.

62 वर्षीय डिंपल यांची प्रकृती खराब असल्याची बातमी येताच, चाहते अस्वस्थ झाले होते. पण काहीच तासांत डिंपल रूग्णालयात भरती असल्याची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते.  खुद्द डिंपल यांनी तसा खुलासा केला होता.

‘ मी जिवंत आहे आणि ठणठणीत आहे. मी नाही तर माझी आई बेटी कपाडिया रूग्णालयात भरती आहे’, असे डिंपल यांनी आयएएनएससोबत बोलताना स्पष्ट केले होते.

नुकताच डिंपल यांची आई बेटी कपाडिया यांचा ८० वा वाढदिवस साजरा झाला होता.  अक्षय आणि त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई बाहेर शिलिम्ब येथे बेटी यांचा वाढदिवस साजरा केला होता. ट्विंकलने या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. यादरम्यान अक्षयसोबतचा बेटी यांचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. 

टॅग्स :डिम्पल कपाडियाअक्षय कुमारट्विंकल खन्ना