अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हिंदी सिनेमातील दिग्गज अभिनेते आहेत. 'जंजीर', 'शोले', 'मुकद्दर का सिकंदर' सारख्या सिनेमांमधून त्यांनी अभिनयाची छाप पाडली. त्यांना महानायक अशी ओळखही मिळाली. वयाच्या ८० व्या वर्षीही ते तासनतास कामात व्यग्र असतात. पण तुम्हाला माहितीए का अमिताभ बच्चन काही वर्षांपूर्वी कर्जबाजारी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेकांकडून कर्ज घेतलं होतं. त्यातल्याच एक होत्या डिंपल कपाडिया (Dimple Kapadia).
होय. अमिताभ बच्चन आर्थिक संकटाचा सामना करत होते. तेव्हा त्यांनी काही जणांकडून उधारी घेतली. डिंपल कपाडिया यांच्याकडूनही त्यांनी पैसे घेतले होते. डिंपल कपाडिया यांनी त्यांच्या मॅनेजरला अमिताभ यांचा नंबर दिला होता. मॅनेजर सतत फोनकरुन बच्चन यांना पैसे मागायचा. इतकंच नाही तर डिंपल कपाडिया त्यांच्या सेक्रेटरीलाही अमिताभ यांच्या घरी पाठवायची. यामुळे अमिताभ बच्चन खूप त्रासले होते. या कठीण प्रसंगाची आठवण काढताना अमिताभ बच्चन एका मुलाखतीत म्हणाले, 'मी ती वेळ कधीच विसरु शकत नाही जेव्हा लोक मला शिव्या आणि धमकी द्यायचे. तो काळ माझ्या ४४ वर्षातला सर्वात वाईट होता.कित्येकदा मी रडायचो.'
नंतर 'कौन बनेगा करोडपती' हा शो त्यांना मिळाला आणि त्यांचं नशीबच पालटलं. त्यांनी छोट्या पडद्यावरही आपली जादू पसरवली. या शोने त्यांना जमिनीवरुन थेट आकाशात पोहोचवलं होतं. अमिताभ बच्चन यांच्यावर ओढावलेली ती परिस्थिती मात्र ते कधीच विसरु शकत नाहीत. आपल्या मेहनतीच्या जोरावर आज त्यांनी इतकं यश मिळवलं आहे. म्हणूनच प्रत्येक पिढीला त्यांचा आदर आहे.
अमिताभ बच्चन यांनी 'ब्रह्मास्त्र' सिनेमात काम केले. तर आता ते प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत 'कल्की 2898 ad' सिनेमात दिसणार आहेत. यामध्ये त्यांचा अॅक्शन अवतार पाहायला मिळणार आहे.