Join us

लेकीचं लग्न अक्षय कुमारशी करण्यास डिंपल कपाडियांचा होता विरोध, आता म्हणाल्या, " बरं झालं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 11:32 AM

डिंपल कपाडिया जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये म्हणाल्या...

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) ही बॉलिवूडमधली आदर्श जोडी आहे. त्यांच्या लग्नाला 23 वर्ष झाली आहेत. दोघांना आरव आणि नितारा ही मुलं आहेत. अक्षय कुमारचं त्याच्या सासूशीही छान नातं आहे. डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) अक्षयला मुलासारखंच प्रेम करतात. अक्षयची न थकता त्या स्तुती करतात. पण सुरुवातीला डिंपल यांनी अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नाला विरोध केला होता. 

डिंपल कपाडिया जयपूरमधील एका इव्हेंटमध्ये म्हणाल्या, "आधी मी ट्विंकलला अक्षयशी लग्न करु देणार नव्हते. पण बरं झालं तिने त्याच्याशीच लग्न केलं. तो खूपच चांगला आणि प्रामाणिक माणूस आहे. मी त्याला इतरांसोबत बोलताना बघते तेव्हा तो सगळ्यांचं अतिशय लक्षपूर्वक ऐकून घेतो. कधी कोणासोबत पत्ते खेळेल तर कधी बास्केटबॉल. त्याच्याशी बोलताना तो समोरचा व्यक्ती खास असल्याची जाणीव करुन देतो. यासोबतच तो खोडकरही आहे."

एक किस्सा सांगताना त्या म्हणाल्या की,"अक्षयने एकदा मला सांगितले की आपल्याला दिल्ली जाऊन मिसेस सोनिया यांना भेटायचं आहे. त्याला एकट्याला जायचं नव्हतं म्हणून तो मला सोबत घेऊन जात होता. जेव्हा तो मला घ्यायला आला तेव्हा म्हणाला की वॉलेट घरीच राहिलंय. यानंतर तो मला घेऊन त्याच्या घरी गेला. जशी मी घरी पोहोचले मला माझ्या ५० व्या वाढदिवसाचं सरप्राईज मिळालं."

याआधी एकदा डिंपल यांनी मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा ट्विंकलने त्यांना अक्षयशी लग्न करायचं आहे असं सांगितलं तेव्हा डिंपल यांनी दोघांना लिव्ह इनमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता. २ वर्ष राहा जर पटलं तर लग्न करा असं त्या लेकीला म्हणाल्या होत्या.

टॅग्स :अक्षय कुमारडिम्पल कपाडियाट्विंकल खन्नाबॉलिवूडलग्न