Join us

डिनो मोरिया म्हणतो, मनोरंजन क्षेत्रात 'हे' माध्यम ही महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 7:15 AM

मॉडेलिंगनंतर अभिनयाकडे वळालेल्या या कलाकारानुसार, 'गेल्यावर्षी प्रदर्शित झालेले अंधाधून, बधाई हो, राझी, मनमर्जिया यांसारखे सिनेमे असो वा अगदी सेक्रेड गेम्ससारखा वेब शो असो, प्रेक्षकपसंतीस उतरलेल्या या सर्व आशयघन कलाकृती आहेत.

ठळक मुद्देडिनोच्या बोलण्यातून तो थ्रिलरपटात काम करण्याकडे झुकते माप असल्याचे जाणवते

सध्या वेबविश्वातील पदार्पण आणि हिंदी सिनेमातील पुनरागमन याबाबत डिनो मोरिया एकदम उत्सुक आहे. यामागचे कारणही खास असल्याचे तो सांगते. 'हे सगळे अशा परिस्थितीत जुळून आले आहे जेव्हा प्रोजेक्टमध्ये कोण आहे यापेक्षा आता आशयाला अधिक महत्त्व दिले जात आहे' असे डिनो सांगतो. 

मॉडेलिंगनंतर अभिनयाकडे वळालेल्या या कलाकारानुसार, 'गेल्यावर्षी प्रदर्शित झालेले अंधाधून, बधाई हो, राझी, मनमर्जिया यांसारखे सिनेमे असो वा अगदी सेक्रेड गेम्ससारखा वेब शो असो, प्रेक्षकपसंतीस उतरलेल्या या सर्व आशयघन कलाकृती आहेत. एकूणच आता केवळ आशयघन कलाकृती बनवण्याकडे झुकते माप दिसत आहे'. मुळात प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी एखादी चांगली कथा असल्यास त्याचे रूपांतर बॉक्सऑफिसवरही दिसून येत असल्याचे डिनोला वाटते. 'या सिनेमा किंवा वेब शोजमध्ये कोण आहे कोण नाही म्हणून नव्हे तर ते खरेच चांगले होते म्हणून चालत आहेत. यानिमित्त कलाकरांनाही त्यांचे अभिनयकौशल्य दाखवण्याची संधी मिळत आहे. सध्या वेब शोज खूप मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहचत असून सिनेमांनाही आता अधिक मोठ्या स्तरावर जगात प्रदर्शित करण्यात येत आहे' असे या स्टारला वाटते. बेजॉय नाम्बियारच्या २०१७साली आलेल्या बहुभाषी प्रायोगिक 'सोलो'सिनेमामध्ये डिनोने काम केले होते.

आता अभिनयाकडे परत वळत असताना डिनोच्या बोलण्यातून तो थ्रिलरपटात काम करण्याकडे झुकते माप असल्याचे जाणवते. 'मला या जॉनरच्या सिनेमात कधीपासून काम करायचे आहे. माझा आगामी सिनेमा थ्रिलरपटात मोडत असून कदाचित मी त्याची निर्मितीही करेन' असे तो सांगते. विशेष म्हणजे डिनो यासोबतच आणखीन एका सिनेमाची निर्मिती करत आहे ज्यात तो स्वतः काम करत नाहीय.

टॅग्स :डिनो मोरियावेबसीरिज