Join us

डीनो मोरिया इतक्या वर्षानंतर एक्स-गर्लफ्रेन्ड बिपाशाबद्दल बोलला, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 11:39 AM

1996 ते 2002 पर्यंत बिप्स व डीनो एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते....

ठळक मुद्देडीनो मोरियासोबत ब्रेकअपनंतर बिपाशा जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

बॉलिवूड अभिनेता डीनो मोरिया (Dino Morea) सध्या ‘द एम्पायर’ या नुकत्याच रिलीज झालेल्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये डीनो शैबानी खानाच्या भुमिकेत आहे. याच वेबसीरिजच्या निमित्ताने डीनोने मुलाखतींचा धडाका लावला आहे. अशाच एका मुलाखतीत डीनो कशाबद्दल बोलला तर त्याच्या एका एक्स- गर्लफ्रेन्डबद्दल. आता ही एक्स-गर्लफ्रेन्ड कोण तर बिपाशा बासू (Bipasha Basu) .

बिपाशा व डीनो यांचं ब्रेकअप होऊन आता जवळजवळ दोन दशकांचा काळ उलटलायं. 1996 ते 2002 पर्यंत बिप्स व डीनो एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. राज, गुनाह, इश्क तुमचे है, चेहरा अशा अनेक सिनेमात एकत्र काम करता करत त्यांची लव्हस्टोरी बहरली. अर्थात कालांतरानं दोघांचं ब्रेकअप झालं.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना डीनोने बिपाशासोबतच्या नात्यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. ब्रेकअपनंतर तुझं व बिपाशाचं बॉन्डिंग कसं राहिलं? असा प्रश्न त्याला विचारला गेला. यावर तो म्हणाला, ‘राज या चित्रपटापासून गुनाहपर्यंत बिपाशासोबतचं माझं बॉन्डिंग कधीच बदललं नाही. ना कधी बदलणार. राज या चित्रपटाच्या वेळी आम्ही एकमेकांना डेट करत होता आणि गुनाह या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आमचं ब्रेकअप झालं होतं. पण यामुळं आमच्या प्रोफेशनल लाईफवर कोणताही परिणाम झाला नाही. मला वाटतं आम्ही दोघेही प्रोफेशनल अ‍ॅक्टर्स आहोत. आजही बिपाशासोबत माझं तसंच बॉन्डिंग आहे. आम्ही आजही चांगले मित्र आहोत. आता आम्ही एकमेकांच्या फार काही संपर्कात नसतो. पण जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा एकमेकांचा आदर करतो.’डीनो मोरियासोबत ब्रेकअपनंतर बिपाशा जॉन अब्राहमसोबत रिलेशनशिपमध्ये होती. 2002 ते 2011 इतकी वर्ष एकमेकांसोबत नात्यात राहिल्यानंतर बिप्स व जॉन लग्न करणार असं मानलं जात होतं. पण त्याआधीच दोघांचं ब्रेकअप झालं. 2016 साली बिपाशाने करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न केलं.

टॅग्स :डिनो मोरियाबिपाशा बासू