डिप्पी ‘जरा जपून’!! दीपिका पादुकोणच्या बोल्ड फोटोशूटवर भन्साळी नाराज!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2017 4:44 AM
दीपिका पादुकोणने एका मॅगझिनसाठी एक अतिशय हॉट असे फोटोशूट केले. दीपिकाच्या या फोटोशूटने संजय लीला भन्साळींना नाराज केले आहे.
ग्लॅमरस दीपिका पादुकोण सध्या बरीच चर्चेत आहे. अलीकडे दीपिकाचा पहिलावहिला हॉलिवूडपट 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’ रिलीज झाला. यानंतर दीपिकाने कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्ये आपल्या रेड कार्पेट लूकने सगळ्यांना वेड लावले. अगदी अलीकडचे म्हणाल तर डिप्पीने एका मॅगझिनसाठी एक अतिशय हॉट असे फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये दीपिका प्रचंड हॉट दिसतेय. पण काही लोकांना दीपिकाचा हा हॉट अवतार जराही भावलेला नाही. सोशल मीडियावर या हॉट लूकवरून दीपिका बरीच ट्रोल झाली आणि आता एक ताजी बातमी आहे. होय, दीपिकाच्या या फोटोशूटने संजय लीला भन्साळींनाही नाराज केले आहे. ALSO READ : 'xxx द रिटर्न ऑफ झेंडर केज’च्या सीक्वलमध्ये दिसणार दीपिका पादुकोणसंजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मध्ये दीपिका लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट सुरुवातीपासून वादात सापडला आहे. कधी या चित्रपटाच्या सेटवर तोडफोड झाली तर कधी भन्साळींना मारहाण झाली. त्यामुळे भन्साळी आता ‘पद्मावती’बद्दल कुठलाही वाद नकोय. त्यामुळेच त्यांना दीपिकाचे हे बोल्ड फोटोशूट खटकले आहे.दीपिकाच्या या फोटोशूटवर अनेक राजपूतांनी आक्षेप नोंदवला आहे. ही अभिनेत्री राणी पद्मावतीची भूमिका कशी साकारू शकते? असा सवाल या राजपूतांनी केला आहे. यासंदर्भाने भन्साळीही दीपिकावर काहीसे नाराज असल्याचे कळतेय. तूर्तास दीपिका ‘पद्मावती’शी जुळलेली आहे. तिच्या या बोल्ड फोटोशूटमुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात. वाद उद्भवू शकतो, असे भन्साळींना वाटते आहे. आता भन्साळींची ही भीती सत्यात उतरू नये, अशी अपेक्षा करूयात. शिवाय दीपिकालाही ‘जरा जपून’चा सल्ला देऊ यात. शेवटी भन्साळींचा ‘पद्मावती’ पाहण्यास आम्ही नाही तर प्रत्येक सिनेप्रेमी उत्सूक आहे. त्यावर कुठल्याही प्रकारे पाणी फेरले जायला नकोय.