Join us  

डिप्पी शिकतेय बंदूक चालवायला....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2016 4:32 AM

दिपीका पदुकोन अगोदरच इतकी हॉट दिसते की, ती अ‍ॅक्शन मुडमध्ये जास्तच हॉट अ‍ॅण्ड सेक्सी दिसते. तिने एखाद्याकडे केवळ पाहिले ...

दिपीका पदुकोन अगोदरच इतकी हॉट दिसते की, ती अ‍ॅक्शन मुडमध्ये जास्तच हॉट अ‍ॅण्ड सेक्सी दिसते. तिने एखाद्याकडे केवळ पाहिले तर तो व्यक्ती तिथेच घायाळ होऊन जाईल त्यासाठी खरंतर बंदूक कशाला हवीय? पण तरीही ती हातात बंदुक घेऊन शिकते आहे.वेल, हे तर चांगलेच आहे ना! ती सध्या तिचा आगामी हॉलीवूडपट डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ द एक्झांडर केज’ साठी शूटिंग करत असून ती सध्या बंदूक चालवायला शिकते आहे. त्यासाठी ती ४ ते ६ आठवडे ट्रेनिंग घेत आहे. ती या क्षणांचा खुप आनंद लुटत आहे.या चित्रपटात ती शिकारी महिलेची भूमिका साकारत आहे. ती चित्रपटाच्या उत्तरार्धात बंदूक घेऊन दिसणार आहे. तशी ती ‘रामलीला’ चित्रपटात बंदूक वापरताना दिसली होती. त्यात काही थोड्यावेळासाठी होती.पण, या हॉलीवूडपटात मात्र बराच वेळ तिला बंदूक घेऊन रहावे लागणार आहे. म्हणून यात ट्रिपल एक्स मध्ये ‘सेरेना’ या शिकारी महिलेची भूमिका साकारणार आहे. यात तिच्यासोबत विन डिजेल देखील दिसणार आहे.