२० वर्षांपूर्वी सोडले दिग्दर्शन; आता अभिनय करणार महेश भट्ट! हिरोईनचे नाव ऐकून बसेल धक्का!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2018 6:52 AM
सुमारे २० वर्षांपूर्वी दिग्दर्शक महेश भट्ट यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन थांबवले. पण आता महेश भट्ट एका नव्या इनिंगला सुरूवात करणार ...
सुमारे २० वर्षांपूर्वी दिग्दर्शक महेश भट्ट यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन थांबवले. पण आता महेश भट्ट एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहेत. होय, महेश भट्ट अॅक्टिंग डेब्यू करणार आहेत. ‘मिर्जा’ या आगामी चित्रपटात महेश अभिनय करताना दिसतील. विशेष म्हणजे, या चित्रपटात त्यांची पत्नी सोनी राजदान या सुद्धा त्यांच्यासोबत दिसतील. सोनी राजदान यापूर्वी २०१३ मध्ये आलेल्या ‘शूटआऊट एट वडाला’मध्ये दिसल्या होत्या. लवकरच त्या ‘राजी’ या चित्रपटाही झळकणार आहेत. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात महेश भट्ट व सोनी राजदान यांची मुलगी आलिया मुख्य भूमिकेत आहे. म्हणजेच, आई व मुलगी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. ‘मिर्जा’ हा चित्रपट दिग्दर्शक तारिक खान दिग्दर्शित करणार आहेत. २००९ मध्ये तारिक यांचा ‘एक से बुरे दो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अर्थात अर्शद वारसी व राजपाल यादव स्टारर हा चित्रपट दणकून आपटला होता. पण आता तारिक नव्या दमाने परतले आहेत आणि आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये त्यांना महेश भट्ट यांनी साथ मिळाली आहे. तारिक यांनी महेश भट्ट यांना ‘मिर्जा’ची स्क्रिप्ट ऐकवली आणि ऐकताक्षणीच यात अभिनय करण्यासाठी ते तयार झालेत. तूर्तास ‘मिर्जा’बद्दल यापेक्षा अधिक तपशील बाहेर आलेला नाही. पण महेश भट्ट पत्नी सोनी राजदानसोबत या चित्रपट अभिनय करणार, या एकाच बातमीने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.ALSO READ : OMG! आलिया भट्टकडे नाही डॅड महेश भट्ट यांच्या चित्रपटासाठी वेळ!!महेश भट्ट सध्या ‘नामकरण’ या टीव्ही शोचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्स’च्या स्पर्धकांना अभिनयाचे बारकावे शिकवताना दिसत आहे. १९९९ मध्ये आलेला अजय देवगण स्टारर ‘जख्म’ हा महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट. त्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी एकही चित्रपट दिग्दर्शित केलेला नाही. अर्थात स्क्रिप्ट रायटिंग व फिल्म प्रॉडक्शनचे त्यांचे काम जोरात सुरू आहे. ब्रिटीश वंशाच्या अभिनेत्री सोनी राजदान यांच्याबद्दल सांगायचे तर त्या सर्वप्रथम ‘बुनियाद’ या मालिकेत दिसल्या होत्या. यानंतर ‘३६ चौरंगी लेन’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूड डेब्यू केला होता.