Join us

दिशा पाटनी-विजे बानीची जमली जोडी; एक मिनिटांच्या व्हिडीओची इंटरनेटवर सनसनी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 10:17 AM

दिशा पाटनी आणि विजे बानी यांचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायलर होत असून, त्यामध्ये दोघींचा अंदाज बघण्यारखा आहे. एक मिनिटांचा हा व्हिडीओ तुफान पसंत केला जात आहे.

‘बागी-२’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत बघावयास मिळालेली दिशा पाटनी सध्या चांगलीच चर्चेत आहे. दिशाने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आली आहे. पाच तासांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत ५०३,७०८ इतके लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. औत्सुक्याची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये बिग बॉस या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोची एक्स स्पर्धक विजे बानीदेखील बघावयास मिळत आहे. एक मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये दिशा आणि विजे बानी कमालीच्या दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघीही एक्सरसाइज करताना दिसत आहेत. बºयाचशा चाहत्यांनी हा व्हिडीओमध्ये बघून दोघींना आणि बिपाशा आणि शिल्पा शेट्टी यांची उपमा दिली आहे. व्हिडीओमध्ये दोघींनी प्युमाची एक्सेसरीज घातलेली आहे. दिशाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक पावलावर स्वत:ला सिद्ध करण्याची माझी धडपड असते, आज आणि प्रत्येक दिवशी’ दिशाने पुढे लिहिले की, Get En Pointe. #DoYou…पहा व्हिडीओमध्ये विजे बानी आणि दिशा पाटनी प्युमा इंडियाचे प्रमोशन करीत आहेत.  दिशा पाटनी तिच्या चित्रपटामुळे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. टायगर श्रॉफची मुख्य भूमिका असलेल्या दिशाच्या ‘बागी-२’ने आतापर्यंत बॉक्स आॅफिसवर १३५ कोटी ३५ लाखांचा बिझनेस केला आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस येत आहे. पहिल्यांदाच दिशा आणि टायगर यांनी मोठ्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर केली. चित्रपटात या दोघांची केमिस्ट्री चांगली जमली असून, चाहत्यांना त्यांचा अंदाज खूपच भावत आहेत. त्यामुळे आगामी काळात हा चित्रपट आणखी किती कोटींपर्यंत मजल मारणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.