Join us  

'स्त्री ३' मध्ये अक्षय कुमार दिसणार? दिग्दर्शक म्हणाले, "...तर त्याला सिनेमा ऑफर होणार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 1:34 PM

आता स्त्री ३ मध्येही अक्षय कुमार असणार का यावर दिग्दर्शकाने नुकतीच प्रतिक्रिया दिली.

यावर्षीचा ब्लॉकबस्टर हिट 'स्त्री 2' (Stree 2) सिनेमा. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी यांची भूमिका असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. अफलातून कॉमेडीमुळे सगळेच खळखळून हसले. सिनेमात वरुण धवनने भेडियाच्या रुपात कॅमिओ केला आहे. तसंच अक्षय कुमारचंही (Akshay Kumar) सिनेमात सरप्राईज पाहायला मिळालं. त्याचाही सिनेमात कॅमिओ आहे. इतकंच नाही तर पोस्ट क्रेडिट सीनमध्येही अक्षयचा रोल इंटरेस्टिंग आहे. आता स्त्री ३ मध्येही अक्षय कुमार असणार का यावर दिग्दर्शकाने नुकतीच प्रतिक्रिया दिली.

मॅडॉक फिल्म्सचा स्त्री २०१८ साली रिलीज झाला होता. सहा वर्षांनी स्त्री २ आला. याही सिनेमाने बॉक्सऑफिसवर तुफान यश मिळवलं. नुकतंच दिग्दर्शक अमर कौशिक (Amar Kaushik) यांनी स्त्री ३ मध्ये अक्षय कुमार असणार की नाही यावर सांगितले, "मला वाटतं स्त्री २ यायला सहा वर्ष लागली. आता स्त्री ३ साठी कमीत कमी तीन वर्षच लागतील. यामध्ये अक्षय कुमार असेल की नाही हे तर स्क्रीप्टवरच अवलंबून आहे. जर कथेची तशी मागणी असेल तर नक्कीच अक्षयची यात भूमिका असेल. तसं नसेल तर त्याला सिनेमा ऑफर होणार नाही."

स्त्री २ चं पोस्टर 'स्ट्रेंजर थिंग्स २' ची कॉपी?

सध्या सोशल मीडियावर स्त्री २ च्या पोस्टरवरुन वाद सुरु आहे. हे पोस्टर 'स्ट्रेंजर थिंग्स 2'च्या पोस्टरसारखंच आहे. स्त्री २ च्या मेकर्सवर कॉपीचा आरोप होत आहे. यावर अमर कौशिक म्हणाले, "आमचा हेतू कॉपी करण्याचा मुळीच नव्हता. हे योगायोगाने झालं आहे. जर आधी माहित असतं तर नक्कीच बदल केला असता."

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडसिनेमा