Join us

दिग्दर्शकाच्या पत्नीनं उर्मिला मातोंडकर यांच्या लगावली होती कानशीलात, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 13:31 IST

Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या कलाविश्वापासून दूर आहेत. पण त्यांनी आजवर बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) सध्या कलाविश्वापासून दूर आहेत. पण त्यांनी आजवर बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. नव्वदच्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत उर्मिला मातोंडकर यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. आज त्यांचा ४९वा वाढदिवस आहे. आपल्या कामामुळे सतत चर्चेत राहिलेल्या या अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिल्या आहेत.

उर्मिला मातोंडकर यांचे अभिनय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांचे काही अभिनेत्यांशी नाव जोडले गेले होते. यामध्ये एका सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचाही समावेश होता. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. रंगीला चित्रपटाचे दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केले होते. याच चित्रपटादरम्यान उर्मिला आणि राम गोपाल वर्मा यांच्यामध्ये जवळीकता वाढली होती. पण तेव्हा राम गोपाल वर्मा यांचे आधीच लग्न झाले होते. म्हणून दोघांनीही कधीच आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नव्हता. पण या दोघांच्या रिलेशनशीपचा परिणाम राम गोपाल वर्मा यांच्या वैवाहिक आयुष्यावर होत होता.

रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉमच्या वृत्तानुसार राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला जेव्हा त्यांच्या नात्याबद्दल समजले तेव्हा त्या अधिक अस्वस्थ झाल्या होत्या. इतकेच नाही तर सेटवर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीने उर्मिला यांच्या कानशीलात लगावली होती. राम गोपाल वर्मा यांनी मुंबईमधील त्यांच्या ऑफिसमध्ये उर्मिला यांच्यासाठी स्पेशल रुम तयार केली होती. त्या रुममधील एका भिंतीवर फक्त उर्मिला यांचेच फोटो होते. 

टॅग्स :उर्मिला मातोंडकरराम गोपाल वर्मा