Join us

'माझ्या मुलीचा छळ होत आहे', दिग्दर्शक हंसल मेहता भडकले; नक्की झालं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 15:46 IST

हंसल मेहता यांनी ही 'हॅरेसमेंट' असल्याचं सांगून तक्रार केली आहे.

'स्कॅम' फेम दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आहे. त्यांच्या मुलीचा छळ होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. X वर त्यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या लेकीला अनेक दिवसांपासून फक्त चकरा माराव्या लागत आहेत. हंसल मेहता यांनी याला 'हॅरेसमेंट' हे नाव दिलं असून तक्रार केली आहे.

हंसल मेहता यांनी X वर लिहिले, "माझी मुलगी गेल्या 3 आठवड्यांपासून आधार कार्ड बनवून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. भर पावसातही अंधेरी पूर्वच्या आधार कार्यालयात ती चकरा मारत आहे. मात्र तिथले अधिकारी रोज काही ना काही कारणं देत तिला परत पाठवत आहेत. इथे सही राहिली, अमुक कागदपत्र आणा, स्टॅम्प चुकीच्या ठिकाणी लागला, आज तुमची अपॉइंटमेंटच नव्हती, मी आता एक आठवड्याच्या सुट्टीवर आहे...हे सगळं खरोखर निराशाजनक आहे. एकप्रकारचं शोषणच आहे."

हंसल मेहतांनी या पोस्टसोबत युआयडीएआय ऑफिस आणि त्यांच्या अकाऊंटला टॅग केलं आहे. यावर आधार अकाऊंटवरुन त्यांना उत्तर आलं आहे. तुमचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि कोणत्या ठिकाणाहून तुम्हाला ही अडचण येत आहे हे डिटेल्स त्यांनी मागितले आहेत. 

हंसल मेहता यांना दुसरी पत्नी सफीना हुसैनपासून किमाया आणि रेहाना या दोन मुली आहेत. तर पहिल्या पतीपासून त्यांना जय आणि पल्लव हे मुलंही आहेत. जय मेहता नुकतीच फिल्म निर्माता म्हणून करिअरला सुरुवात केली. 

टॅग्स :हंसल मेहतापरिवारआधार कार्डमुंबई