‘या’ दिग्दर्शकाने धर्मेंद्र यांच्याशी लबाडीने अॅडल्ट चित्रपटात करवून घेतले काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 2:13 PM
७० ते ८० या दशकात सुपरस्टार राहिलेले अभिनेते धर्मेंद्र आज त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. तब्बल ३० ...
७० ते ८० या दशकात सुपरस्टार राहिलेले अभिनेते धर्मेंद्र आज त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. तब्बल ३० वर्षे इंडस्ट्रीवर राज करणाºया धर्मेंद्र यांना हीमॅन आणि अॅक्शन किंग म्हणूनही ओळखले जाते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९६० मध्ये ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ या चित्रपटातून केली. दमदार व्यक्तिमत्त्व आणि सुंदर चेहºयामध्ये धर्मेंद्र यांना प्रत्येक दिग्दर्शकाची पसंती मिळाली आहे. धर्मेंद्र ९० च्या दशकापर्यंत एक सुपरस्टार बनले होते. त्यांचे स्टारडम त्याकाळी सर्वोच्च स्थानावर होते. परंतु त्याचदरम्यान त्यांनी अशी काही चूक केली, ज्यामुळे त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. होय, ही घटना तेव्हाची आहे जेव्हा ते बी-ग्रेड चित्रपटांचे बादशाह म्हणून ओळख असलेल्या दिग्दर्शक कांती शाहसोबत काम करीत होते. कांती शाह यांनी या चित्रपटादरम्यान धर्मेंद्र यांच्यासोबत एक अशी खेळी खेळली ज्यामुळे धर्मेंद्र यांच्यासह मुलगा सनी देओललाही धक्का बसला. आयएमडीबीनुसार, कांती शाहने धूर्तपणाने धर्मेंद्र यांच्याकडून एका अॅडल्ट चित्रपटात काम करवून घेतले. विशेष म्हणजे, याबाबतची धर्मेंद्र यांना भनकही लागली नव्हती. मात्र कांती शाह यांनी तेव्हा परिसीमा गाठली जेव्हा मसाजच्या बहाण्याने धर्मेंद्र यांचे नग्न शूटिंग केले. त्याचे झाले असे की, एका सीनचे शूटिंग करायचे होते. धर्मेंद्र सीनची प्रतीक्षा करीत होते. त्याचवेळी कांती शाह धर्मेंद्रकडे आले अन् त्यांनी धर्मेंद्रला छातीवर तेल लावण्यास आणि मसाज करण्यास सांगितले. तसेच तुला घोडस्वारीचा सीन करायचा असल्याने तुझी छाती उघडी दिसायला हवी, असेही म्हटले. धर्मेंद्र यांनीदेखील कांती शाहचा सल्ला ऐकत मसाजसाठी तयारी दर्शविली. जेव्हा धर्मेंद्र शरीराला तेल लावण्यास बसले होते तेव्हा कांती शाह यांनी धर्मेंद्रच्या उघड्या शरीराबरोबर त्यांच्या चेहºयाचे काही क्लोज शॉट घेतले. धर्मेंद्र यांना असे वाटले की, कांती शाह शूटिंगची तयारी करीत असावेत. मात्र तोपर्यंत कांती शाहने त्यांच्या चेहºयाचे क्लोज शॉट शूट केले होते. पुढे धर्मेंद्र यांचे हेच क्लोज शॉट कांती शाहने एक रेप सीनमध्ये वापरले. यासाठी कांती शाहने धर्मेंद्र यांच्या बॉडी डबलचा वापर केला. धर्मेंद्र यांच्या चेहºयाचा वापर करून हा संपूर्ण भयावह रेप सीन शूट करण्यात आला. मात्र याविषयी धर्मेंद्र यांना काहीच कल्पना नव्हती. मात्र काही लोकांनी याविषयी धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलला ही बातमी सांगितली. तसेच तुझे वडील एका अॅडल्ट चित्रपटात काम करीत असल्याचेही सांगितले. सुरुवातीला या बातमीवर सनीचा विश्वास बसला नाही. परंतु जेव्हा त्याला काही पुरावे दाखविण्यात आले तेव्हा तो चांगलाच खवळला. त्याने लगेचच कांती शाह यांना फोन करून घरी बोलावले. पुढे सनी देओल याने कांती शाहवर चांगलाच संताप व्यक्त केला. तसेच जर हा चित्रपट प्रदर्शित केला गेला, तर तुझ्यावर कायदेशीर कारवाई करणार अशी धमकीही दिली. सनीचा हा रौद्रावतार बघून कांती शाह घाबरले. पुढे त्यांनी हा चित्रपट रिलीजच होऊ दिला नाही. धर्मेंद्र यांचा हा चित्रपट आज कुठेही उपलब्ध नाही. सनी देओलने धमकी देऊन धर्मेंद्र यांचा हा अॅडल्ट चित्रपट रिलीज होऊ दिला नाही, परंतु धर्मेंद्र यांच्यावर अॅडल्ट चित्रपटात काम केल्याचा ठपका अजूनही आहे.