'या' दिग्दर्शकाने केले सुशांत सिंग राजपूतच्या कामाचे कौतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 6:00 AM
दिग्दर्शक अभिषेक कपूर आपला आगामी चित्रपट 'केदारनाथ'साठी पूर्णपणे तयार आहे. याचित्रपटातून अभिषेक कपूर पहिल्यांदाच सुशांत सिंग राजपूतसोबत पडद्यावर काम ...
दिग्दर्शक अभिषेक कपूर आपला आगामी चित्रपट 'केदारनाथ'साठी पूर्णपणे तयार आहे. याचित्रपटातून अभिषेक कपूर पहिल्यांदाच सुशांत सिंग राजपूतसोबत पडद्यावर काम करणार आहे. तसेच सैफ अली खानची मुलगी सारा अली खान याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. अभिषेक कपूरने सुशांत सिंग राजपूतची स्तुती करताना म्हणाला आहे की, मी या पद्धतीने चित्रपटाची स्टोरी लिहितो आणि त्यातील पात्रांना स्क्रिनवर सादर करतो ती पात्र साकारणे कठिण असते. मात्र हे सगळे सुशांतला जास्त कठिण गेले नाही. आमच्यामध्ये कामाला घेऊन खूप चर्चा व्हायची. एक अभिनेता म्हणून त्याच्या मनात जे प्रश्न निर्माण व्हायचे ते तो बिनधास्त पणे विचारायचा. तो एखादी भूमिका साकारण्याच्या आधी तिचा अभ्यास करतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. काही दिवसांपूर्वी सुशांत सिंगचा आगामी चित्रपट 'सोनचिरईया'मधील डाकूच्या अवतारातील लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. यात सुशांत सिंग निगेटिव्ह भूमिका साकारणार असल्याचे कळतेय आहे. चित्रपटात सुशांतसोबत भूमी पेडणेकर, मनोज बाजपेयी, आशुतोष राणा, रणवीर शौरी आणि श्रीधर दुबे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ALSO READ : बॉलिवूड डेब्यूपूर्वीच सैफची लेक सारा अली खान दाखवू लागली तोरा! सात चित्रपटांना दिला नकार!!'केदारनाथ' हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या प्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. चित्रपटात सारा एक साधी आणि गर्ल नेट डोरच्या इमेजमध्ये दिसणार आहे. वास्तविक सारा खूपच स्टायलिश आणि ट्रेण्ड फॉलो करणारी मुलगी आहे; मात्र या चित्रपटात तिची भूमिका तिच्या पर्सनॅलिटीशी अगदीच विभिन्न प्रकारची आहे. तर सुशांत सिंग राजपूत पिठ्ठूची भूमिका साकारणार आहे. हा दोघांची लव्हस्टोरी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. सारा एका श्रीमंत घरातील मुलगी असते आणि पिठ्ठू तिच्या प्रेमात पडतो. 'केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे. या वर्षाच्या अखेरिस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.