चित्रपट निर्माते केतन आनंद (Ketan Anand) यांनी १९६४ च्या जुन्या गाजलेल्या 'हकीकत' सिनेमाचा सिक्वेलची घोषणा केली. 'हकीकत' हा भारतातील सर्वोत्कृष्ट ब्लॅक अँड व्हाईट वॉर चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. गोव्यात सुरु असलेल्या ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गुरुवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते चेतन आनंद यांचे पुत्र आणि अभिनेता देव आनंद यांचे पुतणे केतन आनंद यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. देव आनंद यांच्या वाढदिवसाला त्यांच्यावरच्या वेब सिरीजचीही घोषणा देव आनंद यांचे नातू वैभव आनंद यांनी यावेळी केली. या चित्रपटात धर्मेंद्र, बलराज साहनी, प्रिया राजवंश, सुधीर, संजय खान आणि विजय आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीतकार मदन मोहन यांची गाणी आजही काळजात घर करून राहिलेली आहेत.
राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेअंतर्गत एनएफडीसी आणि एनएफएआयने भारतीय जुन्या चित्रपटांच्या खराब झालेल्या सेल्युलॉइड रील्समधून अतिशय काळजीपूर्वक पुन्हा जतन केलेल्या जुन्या क्लासिक चित्रपटांचे सात जागतिक प्रीमियर या महोत्सवात दाखवण्यात येत आहेत. यामध्ये चेतन आनंद यांच्या 'हकीकत'चा समावेश आहे.