Join us

"महाराजांबद्दल काही गढूळ लिखाण आहे...", लक्ष्मण उतेकरांनी सांगितला 'छावा'च्या मागचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 17:19 IST

थोडे आकर्षक रंग जर वापरले तर कुठे काय बिघडलं? लक्ष्मण उतेकर काय म्हणाले वाचा

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) या हिंदी सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. विकी कौशलछत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. विकीच्या लूकचं, अभिनयाचं कौतुक होत आहे. 'छावा' सिनेमा बनवण्यामागे मूळ काय विचार काय होता याबद्दल नुकतीच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी माहिती दिली. याविषयी त्यांनी 'लोकमत फिल्मी'शी दिलखुलास संवाद साधला.

'लोकमत फिल्मी' च्या मुलाखतीत लक्ष्मण उतेकर म्हणाले, "एक गोष्ट सांगायची आहे की चित्रपट बघताना तुम्ही एन्जॉय तर करालच, महाराजांची जीवनगाथा तर कळेलच. पण त्याचवेळी तुमचं मनोरंजनही होईल. महाराजांबद्दल काही गढूळ लिखाण आहे आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला आकर्षक रंगांचा वापर करावाच लागतो. काही लोक म्हणतीलही की हे असं नव्हतं पण जे आहे ते कोणी पुसलं का? मग ते पुसण्यासाठी थोडे आकर्षक रंग जर वापरले तर कुठे काय बिघडलं? कारण त्याचा आऊटपुट काय आहे तर 'महाराज काय होते', ते किती थोर मोठे योद्धा होते. त्यांचं बलिदान काय होतं. मग ते आउटपुट दाखवण्यासाठी जर हे करावं लागलं तर काही हरकत नसावी. 

जेव्हा मी त्यांचं बालपण बघतो तेव्हा मला ते पटतच नाही. महाराज असे नसतीलच असं मला वाटतं. पण ते पुसून टाकण्यासाठी,  लोकांना आकर्षित करण्यासाठी तुम्हाला निऑन रंग वापरावेच लागणार नाहीतर ते पुसलं जाणार नाही.  तो मूळ विचार माझ्या डोक्यात होता की चित्रपट बनवायचा तर तो कमर्शियल आणि मुलांनी एन्जॉय केला पाहिजे. कारण हल्ली प्रत्येक मूल फोनमध्ये स्क्रोल करत आहे. जे आपले थोर आहेत त्यांना विसरलेत. पिक्चर बघताना त्यांनी  एन्जॉय केला पाहिजे, अच्छा महाराज असे होते, एवढे मोठे होते असं त्यांना वाटलं पाहिजे. हा बेसिक विचार चित्रपट बनवताना होता."

टॅग्स :विकी कौशलबॉलिवूडछत्रपती संभाजी महाराजसिनेमा