Join us

'ही फक्त संसद नाही तर संपूर्ण भारत', रोहित शेट्टीने संसदेच्या नवीन इमारतीला दिली भेट, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 1:23 PM

नवीन संसद भवन हे भव्य वास्तुकलेमुळे जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

नवीन संसद भवन हे भव्य वास्तुकलेमुळे जगभरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही इमारत आधुनिक सुविधांनी आणि अत्याधुनिक गॅजेट्सने सुसज्ज आहे. संसदेतील लोकसभेचं सभागृह राष्ट्रीय पक्षी मोराच्या थीमवर, तर राज्यसभेच्या सभागृहाची रचना राष्ट्रीय फूल कमळाच्या थीमवर करण्यात आलेली आहे. राजकीय नेत्यांसह सेलिब्रेटीदेखील नवीन संसद भवनाला भेट देत आहे. नुकतेच चित्रपट निर्माता रोहित शेट्टीनेही नवीन संसद भवनात पोहचला. ज्याचा व्हिडीओ त्याने आता इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

रोहित शेट्टी अगदी पारंपारिक पोशाखात नवीन संसद भवनात पोहोचल्याच दिसून आलं. दिग्दर्शकाने व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'नव्या भारताची नवी संसद भवन. ही केवळ संसद नाही तर संपूर्ण भारत आहे. अभिमान, सन्मान आणि कृतज्ञ वाटत आहे'. रोहित शेट्टीचा व्हिडीओ पाहून चाहतेदेखील भारावून जात आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केलाय. 

रोहित शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर  लवकरच त्याचा 'सिंघम अगेन' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ज्यात अजय देवगन, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर, रणवीर सिंग, अक्षय कुमार यांच्याही भूमिका आहेत. दीपिका पदुकोण या चित्रपटात लेडी सिंघमच्या भूमिकेत दमदार ॲक्शन करताना पाहायला मिळणार आहे.  या सिक्वलमध्ये टायगर श्रॉफही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.  

टॅग्स :रोहित शेट्टीसेलिब्रिटीराजकारणसंसदभारत