अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), इमरान हाश्मी, क्रिस्टल डिसूजा, अन्नू मलिक आणि रिया चक्रवर्ती यांच्या भूमिका असलेला ‘चेहरे’ (Chehre ) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. पण तूर्तास या चित्रपटाच्या निमित्तानं दिग्दर्शक रूमी जाफरी (Rumi Jaffery ) यांनी ऐकवलेला एक किस्सा चांगलाच इंटरेस्टिंग आहे.अलीकडे एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत रूमी जाफरी यांनी हा किस्सा सांगितला. तर पोलंडमध्ये उणे 14 डिग्री तापमानात ‘चेहरे’चं शूटींग सुरू होतं. डोंगराच्या माथ्यावर असलेल्या रिसॉर्टमध्ये शूटींग सुरू होतं. याचदरम्यान एक दिवस अमिताभ यांना चक्क उपाशी झोपावं लागलं.
रूमी जाफरी यांनी सांगितलं, ‘पोलंडमध्ये चेहरेच्या शूटींगदरम्यानचा हा किस्सा सांगताना मला त्रास होतोय. गोठवणा-या थंडीत शूट होतं. मी शूटींग लोकेशनच्या जवळच थांबलो होतो तर अमिताभ काही दूर अंतरावर एका हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. माझी बायको माझ्यासोबत होती. एक दिवस माझ्या बायकोनं अमिताभ आणि आनंद यांच्यासाठी जेवण बनवते असं मला सांगितलं. आम्ही ते त्या दोघांनाही कळवलं. चित्रीकरण संपलं की जेवण बनवून त्यांच्याकडे पाठवायचं,असं ठरलं.
अमितजी ७.३० वाजता जेवतात म्हणून आम्ही अगदी वेळेवर जेवण पाठवलं. पण अमितजींना ते मिळालंच नव्हतं. ते जेवणाची प्रतीक्षा करत होते. त्यांच्या बॉयचा फोन आल्यावर आम्हाला हे कळलं. मी लगेच माझ्या ड्रायव्हरला फोन केला तर रस्त्यावर बर्फ पडल्यामुळे तो अडकून पडल्याचं समजलं. आम्ही जेवण पाठवणार असल्यानं अमिताभ यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांचं जेवण बनवायला सांगितलं नव्हतं. शिवाय फार थंडी असल्यामुळे सगळे हॉटेल्सही बंद झाले होते. त्यादिवशी अमितजी उपाशी पोटीच झोपले. मात्र त्यांनी जराही तक्रार केली नाही. काही हरकत नाही.. तुमच्या हातचं जेवणं हे माझ्या नशिबात नव्हतं, असं म्हणून त्यांनी आमची समजूत काढली. इतकंच नाही तर दुसºया दिवशी अगदी वेळेत शूटींग स्थळी दाखल झालेत.