याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनप्रवासावर सिनेमा बनवण्यात आला आहे. 'पीएम नरेंद्र मोदी' असं या बोयपिकचं नाव होतं. अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदी यांची मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे शुटिंग अहमदाबाद येथे करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘इंडिया इन माय वेन्स’ नावाच्या बायोपिकची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष मलिक असणार आहेत. गेल्या 27 वर्षांपासून सुभाष मलिक चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील चित्रपट बनतो म्हटल्यावर यांत कुणाच्या भूमिका असणार, कोणता कलाकार कोणती भूमिका साकारणार याची उत्सुकता वाढू लागली आहे.
कॅप्टन राज माथूर नरेंद्र मोदींची मुख्य भूमिका साकारताना झळकणार आहेत. याशिवाय रझा मुराद, अभिनेता बिंदू दारा सिंह, शाहबाज खान या कलाकारांच्या सिनेमात भूमिका आहेत. या सिनेमाचं बहुतांशी शूटिंगहे अयोध्येत केलं जाणार आहे. याशिवाय यूपी, हरियाणा, पंजाबमध्येही या सिनेमाच्या काही भागांचे शूटिंग करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे सिनेमा पाहण्यासाठी रसिकांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. कारण पुढील सहा महिन्यांच्या आत सिनेमा रसिकांच्या भेटीला आणण्याचा निर्मांत्याचं मानस आहे.
मात्र मोदींच्या जीवनात मोलाचं योगदान असणारी व्यक्ती म्हणजे त्यांच्या आईची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकताही वाढली आहे तसेच मोदींची पत्नी जसोदाबेन ही भूमिका कोणती अभिनेत्री सााकरणार याबाबतची माहिती समोर आली नसून गुलदस्त्यातच आहे.
हा बायोपिक नरेंद्र मोदींच्या 2014 सालापासून पुढील आयुष्यावर अधारित असणार आहे. बायोपिकमध्ये पंतप्रधान मोदी यांनी केलेली विकासकामं दाखवली जातील. गेल्या काही महिन्यांपासून या बायोपिकवर काम सुरू होतं. पण 29 मार्च 2021 चा मुहर्त ठरला असून लवकरच सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात येणार आहे.