Join us

‘या’ दिग्दर्शकाचा झाला भयंकर संताप; शाहरूख खानला म्हटले एलियन!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 3:51 PM

आठवडाभरापूर्वीच दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती प्रेरणा अरोरा ‘केदारनाथ’ या चित्रपटावरून आमने-सामने आले होते. गट्टूने (अभिषेक यांचे निकनेम) चित्रपटाची ...

आठवडाभरापूर्वीच दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि निर्माती प्रेरणा अरोरा ‘केदारनाथ’ या चित्रपटावरून आमने-सामने आले होते. गट्टूने (अभिषेक यांचे निकनेम) चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोरावर आरोप केला होता की, ती चित्रपटासाठी पैसे कमी देत आहे. याप्रकरणी गट्टूने प्रेरणाला नोटीसही दिली होती. अशात प्रेरणाच्या टीमकडूनदेखील गट्टूविषयी काही सेंसिटीव्ही माहिती मीडियामध्ये लिक केली आहे. तिने सांगितले की, गट्टू इंडस्ट्रीतील बºयाचशा लोकांबद्दल निगेटीव्ह बोलतो. ज्यामध्ये शाहरूख खान, करण जोहर, रोहित शेट्टी यांसारख्या बड्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. अभिषेक आणि प्रेरणा यांच्यातील वादामागचे सर्वात पहिले कारण होते, ते म्हणजे ‘केदारनाथ’चे शाहरूख खानच्या ‘झीरो’ या चित्रपटाशी क्लॅश होणे. प्रेरणाला तिचा चित्रपट शाहरूखच्या चित्रपटाबरोबर क्लॅश करायचा नव्हता. त्यामुळे तिने दिग्दर्शक अभिषेक ऊर्फ गट्टू यास चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचे सजेशन दिले होते. चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, या सजेशनमुळे गट्टूचा इगो हर्ट झाला. त्यामुळे प्रेरणाच्या आॅफिशियली अनाउन्समेंटनंतरही त्यांनी ट्विट केले की, दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतील. एवढेच नव्हे तर त्याने बºयाचशा लोकांना ‘झीरो’चा टीजर रिलीज होण्याच्या एक दिवस अगोदरच याबाबतचे मॅसेज पाठविले होते. या मॅसेजमध्ये त्याने लिहिले होते की, ‘मी टीजर बघितला आहे. चित्रपटात शाहरूख इलियनसारखा दिसत आहे.’ वास्तविक अभिषेक कपूर ऊर्फ गट्टू त्याच्या ‘केदारनाथ’ या चित्रपटाबद्दल प्रचंड कॉन्फिडेंट आहे. दरम्यान, ‘केदारनाथ’मधून सारा अली खान डेब्यू करीत आहे. तर करण जोहरच्या ‘धडक’मधून श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये एंट्री करीत आहे. जेव्हा ‘धडक’चे पहिले पोस्टर लॉन्च झाले तेव्हादेखील गट्टूने याविषयी नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. सूत्रानुसार, गट्टूने या चित्रपटाला साउथचा मिक्सिंग चित्रपट वाटत असल्याचे म्हटले होते. पोस्टरवरील दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये काहीही दम वाटत नसल्याचेही त्याने म्हटले. त्याचबरोबर जान्हवीला एकप्रकारचा धोक्याचा इशाराही दिला होता.