Join us

शाहिद कपूरने पद्मावतीच्या रिलीज डेटबाबत केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 7:33 AM

संजय लीला भंसालीने पद्मावती चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केली होती. गेल्या वर्षीपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट ...

संजय लीला भंसालीने पद्मावती चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात केली होती. गेल्या वर्षीपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. मात्र जस जशी  चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत गेली तसा पद्मावतीला विरोध वाढत गेला. 1 डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र विरोध वाढल्याने पद्मावतीच्या निर्मात्यांने चित्रपटाची रिलीज टेड पुढे ढकलली. लेटेस्ट रिपोर्टनुसार सीबीएफसी याआठवड्यात चित्रपट बघायला तयार झाले आहेत. त्यानंतर चित्रपटाच्या रिलीज डेटबाबतचा खुलासा करण्यात येईल. झी सिने अॅवॉर्ड्स दरम्यान शाहिद कपूरला चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर शाहिद म्हणाला की, पद्मावती हा स्पेशल चित्रपट आहे. सध्या तो विवादात सापडला आहे. मला पूर्ण विश्वास आहे या वर्षाच्या अखेरपर्यंत चित्रपटाची रिलीज डेट नक्कीच आपल्याला कळेल. आम्हाला वाटते आहे की चित्रपट लवकरात लवकर रिलीज करण्यात यावा. पद्मावतीमध्ये दीपिका पादुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूरची महत्त्वाची भूमिका आहे. ALSO READ :  ​रणवीर सिंगवर नाराज आहेत संजय लीला भन्साळी! कारण वाचून बसेल धक्का!!‘पद्मावती’वरून देशभर रान माजले आहे. देशभर चित्रपटाला विरोध होतो आहे. राजकीय पक्ष, अनेक राजपूत संघटना व राजस्थानातील काही राजघराण्यांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध केला आहे. काहींनी तर थेट भन्साळींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या चित्रपटात  राणी पद्मावतीची भूमिका साकारणा-या दीपिका पादुकोणलाही जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे रिलीज लांबणीवर टाकण्यात आले आहे. भन्साळींना ‘पद्मावती’ बनवण्यास जवळपास दोन वर्षे लागलीत.  पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट वादात सापडला. चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत, सर्वप्रथम राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या सेटवर धिंगाणा घातला. यावेळी भन्साळींना मारहाणही करण्यात आली. यानंतर चित्रपटाचा सेट कोल्हापुरात हलवण्यात आला. पण इथेही काही अज्ञातांनी सेटवर आग लावली. आता तर हा चित्रपट रिलीज होऊच देणार नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे.नुकतेच हेमा मालिनी यांनी म्हटले होती की दीपिका पादुकोणच्या आधी रानी पद्मावतीची भूमिता त्यांनी साकारली आहे. हेमा मालिनी म्हणाल्या होत्या की,  मला आनंद आहे की मी पद्मावतीची भूमिका साकारली आहे. तेरह-पन्ने चित्रपटात रानी पद्मिनी नावाने होती.