Join us

प्रभास आणि निहारिकाच्या अफेअरच्या चर्चांना पूर्णविराम; ‘या’ अफवा असल्याचा खुलासा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:49 IST

बाहुबली ‘प्रभास’ हा तरुणींच्या गळयातला ताईत आहे. त्याच्या एकेका लूकवर तरूणी अक्षरश: फिदा असतात. मध्यंतरी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पाच हजार मुलींचे स्थळ नाकारले असल्याचे समजते.

बाहुबली प्रभास हा कायमच रिलेशनशिपच्या बाबतीत चर्चेत असतो. दाक्षिणात्य वेगवेगळया अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात येते. मध्यंतरी त्याचे नाव अनुष्का शेट्टी हिच्यासोबत जोडले जात होते. मात्र, तिने नंतर आम्ही दोघे चांगले मित्र आहोत, असा खुलासा केला होता. आता एका दुसऱ्या अभिनेत्रीनेही असाच काहीसा खुलासा केला आहे. ती कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल..तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रभासचे नाव आता निहारिका कोनिडेला हिच्यासोबत जोडले जात होते. मात्र, तिने नुकतेच या अफवा असल्याचा खुलासाही केला आहे. 

बाहुबली ‘प्रभास’ हा तरुणींच्या गळयातला ताईत आहे. त्याच्या एकेका लूकवर तरूणी अक्षरश: फिदा असतात. मध्यंतरी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पाच हजार मुलींचे स्थळ नाकारले असल्याचे समजते. अद्याप तरी त्याला विवाह करण्यायोग्य तरूणी मिळालेली नाही, असे दिसतेय. मात्र तरीही त्याच्या लग्नाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचं नाव देखील आजपर्यंत अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का आणि प्रभासचं अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र दोघांनीही नाकारल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

दरम्यान सध्या प्रभासबरोबर आणखी एका अभिनेत्रीचं नाव जोडलं जात आहे. ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा ही रंगल्या आहेत. तर सध्या अभिनेत्री निहारिका कोनिडेला बरोबर प्रभास रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून होत्या. मात्र पुन्हा एकदा प्रभासबरोबर कोणाचं तरी नाव जोडलं गेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. अभिनेत्री निहारिका कोनिडेलाने या अफवा असल्याचे मीडियासमोर स्पष्ट केलं आहे. नुकतेच एका मुलाखतीमध्ये निहारीकाने या सर्व निराधार असल्याचं म्हटलं आहे. या अफवांवर चाहत्यांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन तिने केले आहे.

निहारिका सुुपरस्टार चिरंजीवी आणि पवन कल्याण यांची भाची आहे. ती स्वत: एक अभिनेत्री देखील आहे. सध्या प्रभासबरोबर तिचं नाव जोडलं गेल्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.   

टॅग्स :प्रभासअनुष्का शेट्टी