बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या नात्याची चर्चा दीर्घकाळापासून आहे. दीर्घकाळापासून टायगर व दिशा रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जात होते. पण टायगर वा दिशा यांनी यावर चुप्पी साधली होती. दोघेही एकमेकांसोबत खुल्लमखुल्ला फिरत असले तरी आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलायला मात्र ते तयार नव्हते. पण काल व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर टायगर व दिशा यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. धक्क्यापेक्षा सगळ्यांना गोंधळात टाकले.
या फोटोनंतर दोघांनीही एन्गेजमेंट केल्याचे मानले गेले. पण दोघांनीही अंगठी एन्गेजमेंट फिंगरऐवजी तर्जनीत घातलेली दिसली आणि चाहते गोंधळात पडले. अखेर टायगर व दिशा या दोघांनीचं या रहस्यावरून पडदा उठवला. होय, हे पोस्ट केलेले फोटो दुसरे तिसरे काही नसून एका जाहिरातीचा भाग असल्याचा खुलासा त्यांनी केला. दोघांनीही त्या जाहिरातीची एक झलक आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केली. ज्यात या अंगठ्यांचा वापर केलेला आहे. एकंदर काय तर आम्ही एन्गेजमेंट केलेली नसून शेअर केलेले फोटो एका प्रमोशनल कॅम्पेनचा भाग होता, हे त्यांनी सांगितले.