Join us

'त्या' घटनेनंतर सहा महिन्यांसाठी झालेला स्मृतिभ्रंश, नेमकं काय घडलेलं दिशा पाटनीसोबत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 10:53 AM

बॉलिवूडची हॉट आणि ॲक्शन गर्ल दिशा पाटनी आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडची हॉट आणि ॲक्शन गर्ल दिशा पाटनी आज तिचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तसेच सहकलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली.  दिशाचे जगभरात चाहते आहेत. आज दिशाला कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण, तुम्हाला माहितेय दिशासोबत एक धक्कादायक घटना घडली होती. ज्यामुळे दिशा खुद्द तब्बल ६ महिने स्वत:चीच ओळख विसरली होती. 

दिशा  ही फिटनेस फ्रिक आहे. वर्कआउटमध्ये ती कोणतीही कसर सोडत नाही. तिचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती जिममध्ये तासनतास घाम गाळते.  सिनेमातील ॲक्शन सिन्स करण्यासाठी ती भरपूर ट्रेनिंग घेते. पण, एकदा जिम्नॅस्टिक ट्रेनिंगदरम्यान तिच्यासोबत वाईट घटना घडली होती. डोक्याला दुखापत झाल्याने तिची सुमारे सहा महिने स्मरणशक्ती गेली होती. 

'मिड डे'शी बोलताना अभिनेत्रीने स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला होता. जिम्नॅस्टिक्सचे प्रशिक्षण घेत असताना दिशा ही डोक्यावर आपटली होती. त्यादरम्यान तिला मोठी दुखापत झाली.  ही दुखापत इतकी गंभीर होती की दिशा सहा महिने तिची स्मरणशक्तीही गमावून बसली होती. ते स्वतःसह इतरांना देखील ओळखू शकत नव्हती. मात्र, अतिशय जिद्दीने तिने या परिस्थितीशी लढा दिला. आजही दिशा आपल्या हेल्थबाबत फार गंभीर आहे. 

 उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये  १३ जून १९९२ रोजी जन्मलेल्या दिशाने २०१६ मध्ये रिलीज झालेल्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी'मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. आपल्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातूनच लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं. दिशाने आतापर्यंत अनेक हीट सिनेमे दिले आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणतीच ओळख नसताना तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची छाप पाडली आहे. दिशा पाटनीचे आज सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

टॅग्स :दिशा पाटनीसेलिब्रिटीबॉलिवूडसोशल मीडियासिनेमाबरेली