आपकी मम्मी आपको नहीं डांटती? दिशा पटानीला युजर्सचा सवाल; पण का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 04:18 PM2019-12-20T16:18:23+5:302019-12-20T16:19:14+5:30

दिशा पटानी ट्रोल...

disha-patani flaunt her sexy and tonned body trolled | आपकी मम्मी आपको नहीं डांटती? दिशा पटानीला युजर्सचा सवाल; पण का?

आपकी मम्मी आपको नहीं डांटती? दिशा पटानीला युजर्सचा सवाल; पण का?

googlenewsNext
ठळक मुद्देदिशा पटानी नवीन वर्षात म्हणजे २०२०ची सुरूवात मोठ्या प्रोजेक्ट्सने करणार आहे.

बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री दिशा पटानी सर्रास सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करताना दिसतेय. साहजिकच चित्रपटांपेक्षा या बोल्ड फोटोंमुळेच दिशा अधिक चर्चेत असते. आता तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केलाय. होय, काही तासांपूर्वी दिशाने ब्ल्यू कलरच्या टू पीसमधील बिकिनी फोटो शेअर केलेत. पण यावेळी मात्र दिशाचा नेम चुकला. होय, या फोटोंची प्रशंसा करण्याऐवजी चाहत्यांनी यावरून तिला ट्रोल करणे सुरु केले. 


होय, चाहत्यांनी तिच्या या फोटोवर काहीशा मजेशीर प्रतिक्रिया दिला. ‘आपकी मम्मी आपको नहीं डांटती’, असा सवाल एका युजरने तिला केला. अन्य एका युजरने दिशाला चांगलेच ट्रोल केले. ‘दुनिया इधर से उधर होगी. लेकिन ये नहीं रूकेगी,’ असे या युजरने लिहिले. ‘देशात एकीकडे आंदोलन सुरु आहे आणि यांना पाहा,’ अशी प्रतिक्रिया एकाने दिली. अर्थात दिशाच्या काही डायहार्ट फॅन्सनी तिच्या या फोटोंचे कौतुकही केले.

दिशा पटानी नवीन वर्षात म्हणजे २०२०ची सुरूवात मोठ्या प्रोजेक्ट्सने करणार आहे. ‘राधे’ या चित्रपटात ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  


‘राधे’ चित्रपटाशिवाय दिशा आदित्य रॉय कपूरसोबत ‘मलंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करत आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२०मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 
सोशल मीडियावर दिशा पटानीचे खूप चांगला फॅन फॉलोविंग आहे. इंस्टााग्रामवर दिशाचे २७ मिलियन फॉलोवर्स आहेत आणि इंस्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोवर्स असणाºया अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Web Title: disha-patani flaunt her sexy and tonned body trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.