Join us

लॉकडाऊनमध्ये घरात बसून कंटाळली दिशा पटानी, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 11:53 IST

कधी बिकनी तर कधी टॉपलेस अशा अंदाजात ती फोटोशूट करत सा-यांची पसंती मिळवत असते.

अभिनेत्री दिशा पटानी  सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे दिशाचा बोलबाला असतो असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कधी बिकनी तर कधी टॉपलेस अशा अंदाजात ती फोटोशूट करत सा-यांची पसंती मिळवत असते. आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. दिशाच्या इंटेंस वर्कआऊटचे रोज नवे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

लॉकडाऊनमुळे राधेचे शूटिंग थांबल्यामुळे दिशा सध्या घरातच आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार दिशा एका मुलाखती दरम्यान म्हणाली, घरात राहणं मुश्किल होते आहे.  हा मात्र या कोरोनाशी लढण्यासाठी घरात राहणंही तेवढेच महत्त्वाचे आहे. रिपोर्टनुसार दिशा म्हणाली, सध्या माझ्याकडे स्वत:साठी खूप वेळ आहे. जो कदाचित शूटिंग आणि ट्रॅव्हल करताना मला मिळाला नसता. मी जास्त वेळ माझ्या पेटसोबत घालवते आहे. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा 'राधे: योर मोस्ट वॉन्टेड हीरो' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान आणि रणदीप हुड मुख्य भूमिकेत दिसणार आहे.हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार होता. मात्र एडिटिंग बाकी आहे. लॉकडाउनमुळे कदाचित या चित्रपटाची रिलीज डेट पुढे जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :दिशा पाटनी