Join us  

दिशा पाटनीची बहीण होती भारतीय सैन्यात अधिकारी, लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 10:58 AM

खुशबूसुद्धा दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आणि फिट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी  ( Disha Patani) ही स्टायलिश तर दिसतेच, पण त्यासोबतच ती फिटनेस फ्रीक देखील आहे.  दिशा पाटनी अभिनय क्षेत्रात असली तरी तिची सख्खी बहीण खुशबू पाटनी ( Disha Patani Sister Khushboo Patani) भारतीय सैन्यात  (Khushboo Patani in Indian Army) अधिकारी राहिली आहे.  खुशबूसुद्धा दिसायला एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आणि फिट आहे.  नुकतंच खुशबूने लष्करी गणवेशातील शेअर केले आहेत. यावर नेटकऱ्यांनी तिचं भरभरुन कौतुक केलं आहे.

स्वातंत्र्यदिन अवघ्या दोन आठवड्यांवर असून खुशबूने सोशल मीडियावर सैन्यातील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये खुशबू तिच्या महिला अधिकाऱ्यांसोबत दिसून येत आहे. कॅप्शनमध्ये तिन लिहलं, "ऑगस्ट महिना आल्यावर माझ्या हृदयाची धडधड जास्त वाढते. माझे डोळे हे नेहमीच माझं माझ्या देशावर असलेलं प्रेम दर्शवतात. तुम्हाला माहितीये का? आम्ही आतापासूनच स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे.  माझ्या सर्व महिला अधिकाऱ्यांना खूप खूप प्रेम".

खुशबूच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रेमाचा वर्षाव केलाय. तिचे हे फोटो प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं. दिशाची मोठी बहीण खुशबूचा जन्म २३ नोव्हेंबर १९९० रोजी बरेली येथे झाला.  तिनं 12वी पर्यंतचे शिक्षण बरेलीतूनच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डीआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर तिनं सैन्य दलात सेवा दिली. सध्या खुशबू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपली फिटनेस जर्नी चाहत्यांसोबत शेअर करत असते.  

दिशा आणि खुशबूचे वडील जगदीश सिंह पटानी हे पोलिसांत डीएसपी रेंजचे अधिकारी राहिले आहेत. त्यांच्या प्रभावामुळेच खुशबूने सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं. खुशबू आणि दिशा यांच्यामध्ये अनेकांना बरंच साम्य आढळून येतं. दिशा आणि खुशबूमध्ये खूपच छान बॉन्डिंग आहे. आपल्या बहिणीचा खूप अभिमान असल्याचं दिशानं अनेक मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. दिशा अनेकदा बहिणीचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असते.  

टॅग्स :दिशा पाटनीभारतीय जवानस्वातंत्र्य दिनबॉलिवूड