Join us  

मिस्ट्री मॅनमुळे Disha Patani आणि Tiger Shroffसोबतच्या नात्यात आला दुरावा?, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 2:47 PM

दिशा व टायगर श्रॉफ कधीकाळी नात्यात होते. मात्र गेल्याकाही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाचा दिशा मिस्ट्री मॅनसोबत दिसतेय. हे पाहून चाहतेही थक्क झाले होते.

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी  (Disha Patani) गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. पुन्हा एकदा दिशा तिच्या मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली आहे. दोघांच्या फोटोनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दिशा व टायगर श्रॉफ (Tiger Shroff) कधीकाळी नात्यात होते. मात्र गेल्याकाही दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु असतानाचा दिशा मिस्ट्री मॅनसोबत फिरताना दिसतेय.  

दिशा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपेक्षा तिच्या लव्हलाईफला घेऊन चर्चेत आहे. टायगर  श्रॉफशी ब्रेकअप होताच दिशाच्या आयुष्यात मिस्ट्री मॅनची एंट्री झाली आहे. अर्थात दिशा आणि टायगरचे चाहते यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. अलिकडेच दिशा मिस्ट्री मॅनसोबत डिनरला गेलेली दिसली होती. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने दिशा व तिच्या मिस्ट्री मॅनचा व्हिडीओ शेअर करताच, चाहतेही थक्क झाले होते. या गोष्टीला आठवडा होत नाही तोवर तिचा नवा फोटो समोर आला आहे. यामुळे टायगरचे चाहते काहीसे नाराज झाले आहे.  

कोण आहे हा मिस्ट्री मॅन?आता दिशाचा हा मिस्ट्री मॅन कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर त्याचं नाव अलेक्झांडर एलेक्स (Aleksandar Alex) आहे. तो दिशाचा जिम ट्रेनर आहे. अलेक्झांडर व दिशा चांगले मित्र आहेत. तो मॉडेल आहे. ‘गिरगिट’ या वेबसीरिजमधून अलेक्झांडरने अ‍ॅक्टिंग डेब्यू केला होता. त्याला हिंदी बोलता येत नव्हतं. पण या वेबसीरिजसाठी तो हिंदी शिकला. दिशा पाटनी अनेकदा आपल्या या मित्रासोबतचे फोटो शेअर करत असते. अलेक्झांडर ही दिशा सोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. अलेक्झांडरनं टायगर श्रॉफसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. 

आता दोघांत फक्त मैत्री आहे की हे नातं मैत्रीपुढे गेलंय, हे ठाऊक नाही. पण अलेक्झांडरसोबत दिशा सध्या जाम खूश्श आहे. अनेकांच्या मते, दिशा व अलेक्झांडर मित्र आहेत. पण काहींच्या मते, दिशा त्याला डेट करतेय. आता खरं काय ते लवकर कळेलच. दिशा आणि टागयरच्या नात्यात अलेक्झांडरमुळे दुरावा आला की ही केवळ अफवा हे लवकरच स्पष्ट होईल.   

टॅग्स :दिशा पाटनीटायगर श्रॉफसेलिब्रिटी