बॉलीवुडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणजे दिशा पटानी. तिचं घायाळ करणारं सौंदर्य, अदा आणि अभिनय यावर रसिक फिदा झाले आहेत. त्यामुळेच तिचे आगामी सिनेमा आणि वैयक्तिक जीवनातील घडामोडींवर तिच्या फॅन्सची नजर असते. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही दिशा आपल्या फॅन्सशी नेहमीच संवाद साधत असते. स्वतःचे फोटो, व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससाठी शेअर करते. तिच्या या फोटोज आणि व्हिडीओला फॅन्सकडून प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. पण नुकत्याच तिने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर तिची चांगलील खिल्ली उडवली जात आहे.
दिशाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटात तिने लाईट क्रिम रंगाचा लहेंगा घातला आणि त्यावर त्याच रंगाची ओढणी घेतली आहे आणि तिच्या हातात दिवा आहे. पण या लहेंगावर तिने ब्लॉऊज घालण्याऐवजी स्पोटर्स ब्रा घातली आहे. त्यामुळे नेटिझन्सने तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे. दिशाने दिवाळीच्या निमित्ताने हा फोटो शेअर केला असला तरी तिने त्यासोबत काहीही कॅप्शन शेअर केलेले नाही. पण तिचा हा फोटो पाहून नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. दिशा तू ब्लॉऊज घालायला विसरलीस का, तू यात खूपच वाईट दिसत आहेस... दिवाळीला तरी चांगले कपडे घालत जा, स्पोटर्स ब्राला ब्लाऊजसारखे कोण घालतं का, फोटो क्लिक करण्याआधी कपडे घालायला विसरलीस का यांसारख्या अचित्रविचित्र प्रतिक्रिया दिशाच्या फॅन्सने तिच्या फोटोवर दिल्या आहेत.
'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून दिशाने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. त्याआधी 'लोफर' या तेलुगू सिनेमातून दिशाने अभिनयाची इनिंग सुरु केली होती. जॅकी चॅनसह 'कूंग फू योगा' या सिनेमातही दिशाने काम केलं होतं. 'बागी-२' सिनेमातही दिशाच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'बागी-२' मध्ये दिशा आणि टायगर श्रॉफची जोडी रसिकांना भावली होती. दिशा सलमान खानच्या भारत या चित्रपटात सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.