सुशांत सिंग राजपूतप्रमाणेच त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूचे गूढही कायम आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवसआधी दिशाने कथितरित्या आत्महत्या केली होती. सुशांत व दिशा या दोन्ही प्रकरणांचे एकमेकांशी कनेक्शन असल्याचा दावा केला जात आहे. तूर्तास दिशाच्या मृत्यूबद्दल रूग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने एक वेगळाच खुलासा केला आहे.दिशाचा मृतदेह मृतदेह सापडला तेव्हा तिच्या शरिरावर कपडे नव्हते, असा दावा याआधी करण्यात आला होता. दिशाच्या कुटुंबीयांनी व मुंबई पोलिसांनी हे वृत्त फेटाळून लावले होते. आता दिशाचा मृतदेह नेण्यासाठी आलेल्या रूग्णवाहिकेचा ड्रायव्हर पंकजनेही दिशाचा मृतदेह कशा अवस्थेत होता, याबद्दल सांगितले आहे.
त्याने सांगितले, 8 जून रोजी दिशाने आत्महत्या केली होती. त्यादिवशी रुग्णवाहिकेसाठी पोलीस ठाण्यातून फोन आला होता. मी रूग्णवाहिका घेऊन पोहोचलो. पण तोपर्यंत दिशाचा मृतदेह खाजगी गाडीतून नेण्यात आला होता. आधी हा मृतदेह मालाडच्या दोन वेगवेगळ्या खाजगी दवाखान्यात नेण्यात आला. त्यानंतर कांदीवलीच्या शताब्दीमध्ये मृतदेह आणण्यात आला.दिशा मृतदेहावर हनुवटीजवळ एक जखम होती. एक हात तुटलेला होता आणि डोक्यातून रक्त वाहत होते. मी मृतदेह पाहिला तेव्हा त्यावर लाल रंगाचा टॉप आणि क्रीम कलरची लेगिंग्ज होती. दिशाचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यावर कपडे होते.
सुशांत आणि दिशाच्या मृत्यूचा थेट संबंध, नितेश राणेंनी लिहिले अमित शहांना पत्र
सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, सुशांत आणि दिशा सालियनच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून झाले नवीन खुलासे
दिशा सालीयन प्रकरण: शवविच्छेदनासाठी पाठवलेला मृतदेह 'न्यूड' च असतो ! डॉ शैलेश मोहिते यांची माहिती मृत्यूपूर्वी दिशाने 100 क्रमांकावर कॉल केला होता का?
मृत्यूच्या अगदी काही वेळ आधी दिशाच्या फोनवरून 100 नंबरवर म्हणजेच मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यात आला होता अशी माहिती समोर आली होती. पण दिशाने 100 नंबरवर फोन केलाच नव्हता असे उघड झाले आहे. पोलिसांना फोन केल्यानंतर दिशाने सुशांतला फोन केला असा खुलासा एका भाजप नेत्याने केला होता. दिशाने पोलिसांना आणि सुशांतला बोलवून तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडत आहे आणि त्याचा जीव धोक्यात आहे असे सांगितल्याच यात म्हणण्यात आले होते. पण तिने हा फोन केलाच नव्हता तर त्यावेळी ती तिच्या लंडनमधल्या एका मैत्रिणीशी बोलत असल्याचे तपासात समोर आले आहे.