Join us

मुलीच्या मृत्यूपेक्षाही अफवा अधिक वेदनादायी...! दिशा सालियानच्या वडिलांनी 3 जणांविरूद्ध दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 12:02 PM

सुशांत सिंग राजपूत आणि त्याची एक्स- मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूमध्ये काही कनेक्शन आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण...

ठळक मुद्देसतीश सालियान यांनी दिशाबद्दल पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सुशांत सिंग राजपूत आणि त्याची एक्स- मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूमध्ये काही कनेक्शन आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या दोन्हींचा संबध आहे, असा दावा करत सोशल मीडियावर वेगवेळे आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. या आरोपांमुळे व्यथित होत दिशाचे वडील सतीश सालियान यांनी तीन लोकांविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिशाच्या वडिलांनी अफवा पसरवणा-या तिघांविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिशाच्या वडीलांचा जबाब नोंदवला आहे.

सतीश सालियान यांनी दिशाबद्दल पसरवण्यात येत असलेल्या अफवांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी आपला हा संताप बोलून दाखवला. ‘मुलीच्या मृत्यूने आधीच आम्ही धक्क्यात आहोत. अशात तिच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. तिला बिल्डींगवरून फेकण्यात आले, तिचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला, असे काय काय बोलले जात आहे. या गोष्टींमध्ये काहीही सत्यता नाही. या अशा अफवा आमच्यासाठी प्रचंड अपमानस्पद व वेदना देणा-या आहेत,’ असे तिच्या वडिलांनी म्हटले.दिशा सुशांतला केवळ एकदा भेटली होती. त्यांच्यात काहीही संबंध नव्हते, असा दावाही त्यांनी केला.

दिशाची आई म्हणाली की, सर्वात आधी मी देशातील लोकांशी, मीडियाशी, सोशल मीडियातील लोकांना सांगते हे सर्व चुकीचं आहे. सर्व बातम्या खोट्या आणि अफवा आहेत. मी माज्या मुलीला गमावलं आहे पण आता अशाप्रकारच्या चर्चा आम्हालाही मारुन टाकतील. सुप्रीम कोटार्ने या सर्व चर्चांना थांबवले पाहिजे. आम्ही खूप पीडित आहोत. आता आमच्या मुलीबद्दल खोटं ऐकण्याची ताकद आमच्यात नाही अशी विनवणी केली आहे.

 आम्हाला कोणावरही शंका नाही... आम्हाला कोणावरही शंका नाही, त्या रात्री तिच्यासोबत खूप जवळचे मित्र होते, तिचा एक मित्र भावासारखा होता. शाळेपासून त्यांची मैत्री होती, ती त्याला राखी बांधत होती. नेत्यांचे आरोप ऐकले तर खूप राग येतो, दिशाचे कोणासोबतही संबंध नव्हते. ज्यांचे नाव घेतले जात आहे, त्यांना ती भेटलीही नाही. त्यांचे नंबरही तिच्याकडे नव्हते. फोटो नाहीत. सुशांत प्रकरणात माझ्या मुलीला ओढले जात आहे.हे लोक आम्हाला जगू देणार नाहीत, असे काही दिवसांपूर्वी दिशाची आई एका मुलाखतीत म्हणाली होती.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत