मुंबई - देशभरात २००१ मध्ये धुमाकूळ घातलेल्या गदर : एक प्रेमकथा (Gadar: Ek prem katha) हा चित्रपटाचा सिक्वल प्रदर्शित होत आहे. तारासिंग आणि सकीना मेमसाब यांच्या हिंदुस्तान-पाकिस्तान प्रेमाची कथा आणि फाळणीच्या घटनेवर आधारीत हा चित्रपट सुपरहीट ठरला होता. आता, तब्बल २० वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल येत आहे. शुटींगदरम्यानच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेल्या 10 दिवसांपासून हिमाचल प्रदेशमध्ये चित्रपटाची शुटींग सुरू आहे.
पालमपूर येथील भलेड गावाजनकी या चित्रपटातील कही सीनचे चित्रीकरण होत आहे. भलेड गावातील ज्या बंगल्यात गदर 2 या चित्रपटाचे शुटींग सुरू आहे, त्या बंगल्याच्या मालकाने चित्रपटाच्या निर्मात्यावर पैसे न दिल्याचा आरोप केला आहे. येथील शुटींगनंतर जेवढे पैसे कंपनीकडून देण्यात येणार होते, तेवढे पैसे कंपनीकडून देण्यास मनाई करण्यात येत आहे. शुटींगसाठी केवळ 3 रुम आणि 1 हॉलच्या वापरासंदर्भातच चर्चा झाली होती. ज्याचे भाडे 11 हजार रुपये प्रति दिवस ठरले होते. मात्र, निर्मात्यांनी चित्रपटाच्या शुटींगसाठी आता संपूर्ण घरच स्वत:च्या ताब्यात घेतल्याचे घरमालकने म्हटले आहे.
घरमालकाने चित्रपटाच्या शुटींगचे एकूण भाडे ( ज्यामध्ये झालेल्या नुकसानीचीही रक्कम आहे) 56 लाख रुपये निर्मात्याकडे पाठवले. त्यामुळे, निर्माता कंपनी आणि घरमालकामध्ये वाद रंगला आहे.
दरम्यान, गदर 2 या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलिज करण्यात आला होता. अभिनेत्री अमिषा पटेलने या चित्रपटाच्या शुटींगचा एक फोटोही इंस्टाग्रामवरुन शेअर केला होता. गदर चित्रपटाच्या सिक्वलमध्येही सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल यांची सुपरहीट जोडी दिसणार आहे. सोबतच, उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) हेही मुख्य भूमिकेत आहेत. सोशल मीडियावर गदर 2 चित्रपटातील शुटींगच्या सेटवरील एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्यात, पगडी बांधून सनी देओल दिसत आहे. तर, ऑरेंज कलरच्या पंजाबी ड्रेसमध्ये सकीना म्हणजे अमिषा पटेल दिसून येते. हा फोटो पाहून अनेकांनी गदर चित्रपटाच्या आठवणी जागवल्या आहेत. तसेच, नेटीझन्सने चित्रपटाची उत्सुकता असल्याच्या कमेंटही करत आहेत.
गदर चित्रपटातील डायलॉगने धुमाकूळ
गदर एक प्रेम कथा या चित्रपटात "पाकिस्तानला रिक्रिएट करण्यात आले होते. यापूर्वी चित्रपटामध्ये असा प्रकार कधीच घडला नव्हता. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणे सुपरहीट झाल्याने चित्रपटानेही बॉक्स ऑफिसरवर मोठा गल्ला जमवला होता. सनी देओलच्या पहाडी आवाजात, हिंदुस्तान झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा... या डायलॉगने थेअरटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत होता. अनेकांनी सिनेमागृहात दोन-तीनवेळा जाऊन हा चित्रपट पाहिला होता.