आपल्या अदा आणि सौंदर्यानं नव्वदच्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी रसिकांना वेड लावलं होतं. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे रंभा. 'जुडवाँ' आणि 'बंधन' अशा सिनेमात रंभा सलमानसह रोमान्स करताना पाहायला मिळाली होती. रंभा ही त्याकाळातील अभिनेत्री दिव्या भारती हिची डुप्लिकेट असल्याचे बोललं जात असे. त्यामुळे रंभाच्या पारड्यात बड्या बड्या दिग्दर्शकांचे सिनेमा पडले. तिला विविध दिग्गज अभिनेत्यांसह काम करण्याची संधी लाभली. सलमान खान, अजय देवगण, रजनीकांत गोविंदा, अक्षय कुमार, मिथुन चक्रवर्ती अशा बड्या कलाकारांसह रंभा रुपेरी पडद्यावर झळकली होती. तेलुगू सिनेमापासून रंभाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.
1995 साली जल्लाद सिनेमातून रंभानं हिंदी रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. त्यानंतर दानवीर, प्यार दिवाना होता है, कहर, जुडवाँ, जंग, सजना, बंधन, घरवाली-बाहरवाली, बेटी नंबर वन, क्रोध, दिल ही दिल में अशा विविध सिनेमात काम केलं. मात्र लग्नानंतर तिने आपल्या संसारात लक्ष घातलं. मात्र आजही रंभाला पाहताच दिव्या भारतीची आठवण झाल्या शिवाय राहात नाही.
5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारतीचे निधन झाले होते. फक्त 19 वर्षाची दिव्याच्या अशी अचानक एक्झिट सा-साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. दिव्या आज या जगात नसली तीरीही तिच्या गाजलेल्या भूमिकांममधून ती आपल्यातच असल्याचे प्रत्येकालाच वाटतं. 5 एप्रिल हा दिवस बॉलिवूडकरासांठी काळा दिवस म्हणून मानला जातो. 90च्या दशकातील सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून दिव्या आपले स्थान निर्माण केले होते. वयाच्या 19 व्या वर्षीच दिव्याने 14 सिनेमा काम केले होतो. त्यात 7 हिंदी आणि 7 दाक्षिणात्य सिनेमाचा समावेश होता.