Diya Mirza Birthday Special : दिया मिर्झा चित्रपटात काम न करता करते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 09:00 PM2018-12-09T21:00:00+5:302018-12-09T21:00:01+5:30

दिया आज चित्रपटात अधिक काम करत नसली तरी ती सामाजिक कार्यात अग्रेसर असते. सामाजिक समस्या आणि प्रश्न यांची जाणीव असलेल्या दिया अनेक एनजीओमार्फत काम करते.

Diya Mirza Birthday Special : Lesser known facts about Dia Mirza | Diya Mirza Birthday Special : दिया मिर्झा चित्रपटात काम न करता करते हे काम

Diya Mirza Birthday Special : दिया मिर्झा चित्रपटात काम न करता करते हे काम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘ग्रीन एन्वाइरमेंट’तर्फे तिला २०१२ मध्ये ‘ग्रीन अ‍ॅवॉर्ड’ मिळाला. आजवर तिने महिलांसाठी एचआयव्ही जागरूकता, कॅन्सरच्या रूग्णांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत. ‘नर्मदा बचाओ आंदोलनालाही तिने पाठिंबा दर्शवला होता.

दिया मिर्झाचा आज म्हणजेच 9 डिसेंबरला वाढदिवस असून तिचा जन्म हैद्राबादमधील आहे. तिच्या सौंदर्यावर, हास्यावर तिचे फॅन्स फिदा आहेत. दिया मिर्झाने कॉलेजमध्ये असताना मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणूनही काम केलेले आहे. त्याचवेळी तिने अनेक प्रसिद्ध ब्रँडच्या प्रिंट आणि टीव्ही कमर्शियल्ससाठी मॉडेलिंग केले. 2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. तिने रहेना है तेरे दिल में या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली. या चित्रपटातील तिचे काम, आर. माधवनसोबत जमलेली केमिस्ट्री, या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. आज या चित्रपटाला अनेक वर्षं झाले असले तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या चित्रपटानंतर ती दिवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दम, दस, लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये झळकली. पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. नुकतीच ती संजू या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने मान्यता दत्तची भूमिका साकारली होती. तिने बॉबी जासूस या चित्रपटाची देखील निर्मिती केली आहे. 

दिया आज चित्रपटात अधिक काम करत नसली तरी ती सामाजिक कार्यात अग्रेसर असते. सामाजिक समस्या आणि प्रश्न यांची जाणीव असलेल्या दिया अनेक एनजीओमार्फत काम करते. होईल तेवढी समाजाची सेवा करण्याचं व्रत तिनं स्वीकारलंय. ‘ग्रीन एन्वाइरमेंट’तर्फे तिला २०१२ मध्ये ‘ग्रीन अ‍ॅवॉर्ड’ मिळाला. आजवर तिने महिलांसाठी एचआयव्ही जागरूकता, कॅन्सरच्या रूग्णांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत. ‘नर्मदा बचाओ आंदोलनालाही तिने पाठिंबा दर्शवला होता.


दियाचे लग्न 2014 मध्ये साहिल संघा सोबत झाले. त्या दोघांनी अनेक वर्षांच्या नात्यानंतर लग्न केले. फ्रँक हँडरिच आणि दिपा असे तिच्या आईवडिलांचे नाव आहे. वडील जर्मन ख्रिश्चन आणि आई बंगाली हिंदू असल्याने तिच्यावर दोन्ही धर्मांचा प्रभाव आहे. दिया साडेचार वर्षांची असताना तिच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दोघांनी पुन्हा लग्न केले. तिच्या आईने अहमद मिर्झासोबत दुसरे लग्न केले. त्यामुळे दिया त्यांचेच नाव लावते.  

Web Title: Diya Mirza Birthday Special : Lesser known facts about Dia Mirza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.