Join us

बॉलिवूडच्या ‘मोदी मीटिंग’वर भडकली दिया मिर्झा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 2:55 PM

नुकतीच बॉलिवूडच्या काही दिग्गज निर्मात्या व अभिनेत्यांनी  पंतप्रधान मोदींची भेट घेतली. अक्षय कुमार, करण जोहर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करत, ही  ही भेट खूपच सकारात्मक ठरली, असे म्हटले होते.

ठळक मुद्दे‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव हिनेही या मीटिंगमध्ये बॉलिवूडची एकही महिला प्रतिनिधी नसल्याबद्दल नाराजी बोलून दाखवली.

नुकतीच बॉलिवूडच्या काही दिग्गज निर्मात्या व अभिनेत्यांनी  पंतप्रधान मोदींची भेट घेतली. अक्षय कुमार, करण जोहर यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करत, ही  ही भेट खूपच सकारात्मक ठरली, असे म्हटले होते. मात्र अक्षय व करणने या भेटीचे फोटो शेअर करताच, अनेकांना एक गोष्ट प्रकर्षाने खटकली. ती म्हणजे, पंतप्रधानांना भेटलेल्या या   प्रतिनिधी मंडळात एकही  अभिनेत्री किंवा दिग्दर्शिका नव्हती. अनेकांनी याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. अभिनेत्री दिया मिर्झा हिने तर यानिमित्ताने थेट अक्षय कुमार व मोदींवर निशाणा साधला. या मीटिंगला दियाने ‘आॅल मॅन मीटिंग’, असे संबोधले. अक्षयचे ट्वीट रिट्वीट करत दियाने परखड सवाल केला.

‘हे आश्चर्यकारक आहे. एकही महिला या मीटिंग रूममध्ये नसावी, याचे काय कारण असू शकते?’, असा सवाल तिने केला. केवळ दियाचं नाही तर अनेकांनी या मीटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची दिग्दर्शिका अलंकृता श्रीवास्तव हिनेही या मीटिंगमध्ये बॉलिवूडची एकही महिला प्रतिनिधी नसल्याबद्दल नाराजी बोलून दाखवली.

गेल्या काही महिन्यात ‘मी टू’  मोहिमेमुळे बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. कामाच्या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक महिलांसोबत गैरवर्तणुक होते. काहीं महिलांकडे शरीरसुखाची मागणी केली जाते.  अभिनेत्याच्या तुलनेत महिला कलाकारांना कमी मानधन  दिले जाते, यांसारख्या अनेक समस्या या इंडस्ट्रीत आहेत. या  समस्याही प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्या का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

टॅग्स :दीया मिर्झाअक्षय कुमारकरण जोहर