लॉकडाउनदरम्यान या व्यक्तीसोबत वाढली दीया मिर्झाची जवळीक, १५ फेब्रुवारीला घेणार दुसऱ्यांदा सात फेरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 11:30 IST
Dia Mirza to tie the knot with businessman : अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करते आहे.
लॉकडाउनदरम्यान या व्यक्तीसोबत वाढली दीया मिर्झाची जवळीक, १५ फेब्रुवारीला घेणार दुसऱ्यांदा सात फेरे
बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. ती लवकरच बिझनेसमन वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे. या लग्नसोहळ्याला काही जवळची मंडळी उपस्थित राहणार आहेत.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दीया मिर्झा १५ फेब्रुवारीला वैभव रेखीसोबत सात फेरे घेणार आहे. यात तिचे काही खास फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर उपस्थित राहणार आहेत. हे लग्न अगदी खासगी ठिकाणी ठेवली जाणार आहे. जिथे त्या दोघांच्या जवळचे व्यक्ती सहभागी होऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना व्हायरसमुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनदरम्यान दीया आणि वैभव यांच्यातील मैत्री वाढली. दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतित करू लागले.
वैभव रेखी मुंबईतील बिझनेसमन आणि इन्व्हेस्टर आहे. तसेच प्रसिद्ध योगा इंस्ट्रक्टर सुनैना रेखीचा नवरा होता. सुनैना आणि वैभवला एक मुलगीदेखील आहे. दीयाचे पहिले लग्न साहिल संघासोबत झाले होते. त्यानंतर दोघे ११ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २०१९ मध्ये सोशल मीडियावर विभक्त होत असल्याचे सांगितले होते.
दीया मिर्झा आणि साहिल संघा या दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी सांगितले होते की, आम्ही वेगळे होत आहोत पण आमच्यातील नाते नेहमीच मैत्रीपूर्ण राहिल. आम्ही कायदेशीर रित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही नेहमी चांगले फ्रेंड्स राहणार आहोत आणि नेहमी एकमेकांचा आदर करणार आहोत.
वयाच्या १६ व्या वर्षी दीया मिर्झाने कामाला सुरूवात केली. ती एका मल्टी मीडिया कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत होती. कॉलेजच्या दिवसात दीयाला मोठ्या कंपनीकडून मॉडेलिंगसाठी ऑफर मिळाली. मिस एशिया पॅसिफिकचा किताब पटकावल्यानंतर बॉलिवूडमधील दरवाजे खुले झाले. दीया मिर्झाने रहना है तेरे दिल में, तहजीब, कोई मेरे दिल में है, लगे रहो मुन्ना भाई आणि थप्पड या चित्रपटात काम केले आहे.