Join us

​*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,*...आनंदी जीवन जगायला शिकवते हे गाणे !!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 6:42 AM

​*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,**हैरान हूँ मैं*

रवींद्र मोरे *तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी,**हैरान हूँ मैं**तेरे मासूम सवालों से,* *परेशान हूँ मैं.....*किती वर्ष झाली हे गाणे ऐकतोय/बघतोय पण,  कधी पण हे गाणे ऐकताना वेगळाच आनंद मिळतो. कधी गुलजार यांची शब्दरचना, त्याच्यातील तरलता आणि सहज सुंदर शब्द तर कधी आरडींचे संगीत आणि या दोघा दिग्गजांना तितक्याच ताकदीने साथ देणार्या गायकांची कमाल... लता मंगेशकर आणि अनुपजींची..... *या गाण्यातील प्रत्येक ओळ, शब्द हे मनाला हलकेच स्पर्श करतात आणि जीवनाचा अर्थ तपासुन पहायला भाग पाडतात.*तुझसे नाराज़ नहीं ज़िन्दगी, हैरान हूँ मैंतेरे मासूम सवालों से, परेशान हूँ मैं.खरच आपल्या आयुष्यात असे किती तरी वेळा असे साधे-साधे प्रश्न येतात, ज्याची आपण उत्तरे शोधायची प्रयत्न करतो .... कधी मिळतात तर कधी तसेच सोडुन द्यावे लागतात ......जीने के लिए सोचा ही नहींदर्द संभालने होंगेमुस्कुराये तो मुस्कुराने केक़र्ज़ उतारने होंगेमुस्कुराऊं कभी तो लगता हैजैसे होंठों पे क़र्ज़ रखा हैप्रत्येक माणसाची राहिलेली काही स्वप्न, काही ईच्छा किंवा काही झालेल्या चुका..... ज्या आपल्याला बरोबर घेऊन आपले आयुष्य हे जगावेच लागते आणि मग कधी कधी अचानक जगता जगता लक्षात येते कि आपण जे हे हसतो आहोत, आनंद घेतो आहोत याचे देणे आपण एकतर दिलेले असते किंवा द्यायचे बाकी असते. अशी काही दुखे असतात की आपल्याला ती बरोबर घेऊन सर्वांपासुन लपवुन हसत हसत जगावेच लागते .... जणु काही हा दु:खे म्हणजे, जगण्यासाठी घेतलेली कर्जच असतात. अन् ती फेडावीच लागतात .ज़िन्दगी तेरे गम ने हमेंरिश्ते नए समझाएमिले जो हमें धूप में मिलेछाँव के ठन्डे सायेकिती सुंदर कडवे आहे, हे अगदी खरय आपल्या आयुष्यात येणार्या दु:खानीच आपल्याला खरी नाती लक्षात येतात. उन्हामध्ये जश्या थंड सावलीचे भास होतात तसेच या काळात खोटी सहानुभूती दाखवणारेच जास्त भेटतात.आज अगर भर आई हैबूंदे बरस जाएगीकल क्या पता किन के लिएआँखें तरस जाएगीजाने कब गुम हुआ कहाँ खोयाइक आंसू छुपा के रखा थाआज असे वाटते की ज्या भावना मी जगापासुन लपवुन ठेवल्या आहे त्या आज बरसुन जातील ... तर काय सांगता येते कुणाच्या येण्याची वाट बघता बघता हे डोळे शुष्क होउन जातील ..... या साठीच एक अश्रू लपवला होता, काय माहिती तो हरवला कि गायब झाला.... !!!!असे हे सगळे सहन करत आनंदाने *जगायचे असते* ..... *जगायचे असते.*